पुणे कोणाची जहागिरी नाही
By Admin | Updated: February 15, 2017 02:35 IST2017-02-15T02:35:01+5:302017-02-15T02:35:01+5:30
अभिव्यक्तिी स्वातंत्र्याचा हक्क घटनेनेच मला दिला आहे. जोवर जिवंत आहे, तोवर मी बोलतच राहीन. प्रक्षोभक बोलत असल्याचा आरोप

पुणे कोणाची जहागिरी नाही
पुणे : अभिव्यक्तिी स्वातंत्र्याचा हक्क घटनेनेच मला दिला आहे. जोवर जिवंत आहे, तोवर मी बोलतच राहीन. प्रक्षोभक बोलत असल्याचा आरोप करून मला पुण्यात येण्यापासून रोखणारे, नोटीस देणारे पोलीस उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस, शरद पवार, अजित पवार यांना नोटीस देणार का? पुणे कोणाच्या बापाची जहागिरी नाही, अशी टीका मजलीस ए इत्तेहादुल मुस्लमीन पक्षाचे (एमआयएम) राष्ट्रीय अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी मंगळवारी येथे केले.
एमआयएम आणि रिपब्लिकन युवा मोर्चाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी ओवेसी यांची जाहीर सभा टिंबर मार्केट परिसरात झाली. त्यावेळी ते बोलत होते. पक्षाचे नेते अंजुम इनामदार, शहराध्यक्ष जुबेर शेख, रिपब्लिकन युवा मोर्चाचे नेते राहुल डंबाळे, मिलिंद अहिरे, शैलेंद्र भोसले यांच्यासह शहराच्या विविध भागांतील उमेदवार उपस्थित होते. युवकांची मोठी गर्दी सभेसाठी झाली होती.
पुणे पोलिसांनी ओवेसी यांच्या सभेसाठी परवानगी नाकारली होती. त्या पार्श्वभूमीवर झालेल्या सभेत ओवेसी म्हणाले, दोन वर्षांपूर्वी सभा झाली, तेव्हा मला रोखले गेले नाही. पालिका निवडणुकांसाठी मी येत आहे, असे दिसताच प्रक्षोभक वक्तव्याच्या, समाजात दुही पाडत असल्याच्या आणि जिवाला धोका असल्याच्या कारणावरून मला खडक पोलिसांनी विमानतळावरच नोटीस बजावली. सोलापूर, नागपुरात आज माझ्या सभा रोखल्या गेल्या नाहीत, मग पुण्यातच हा प्रकार का? मी कोणत्याही धर्माच्या विरोधात बोलत नाही. मला मुस्लिम असल्याचा अभिमान आहे, पण मी हिंदुंच्या विरोधात नाही. अन्याय, दु:ख, दारिद्र्य यावर बोलतो. माझे प्राण गेले तरी चालतील. मी हिंदुस्थानी जगतात चालणाऱ्या गैरप्रकारांविरुद्ध आवाज उठवत राहीन. ओवेसी यांनी शरद पवार, अजित पवार यांच्यावर टीका केली.
कॅशलेस इकॉनॉमीच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्णयावरही त्यांनी टीका केली. मोहसीन शेख याच्या खुन्यांना जामीन मिळतो, त्याबद्दल सरकारने सर्वोच्च न्यायालयात दादा मागवी. खुन्यांना फाशी द्यावी, अशी मागणी ओवेसी यांनी केली. (प्रतिनिधी)