‘सीएसएसीएफ २.०’मध्ये पुण्याला सर्वाधिक रेटिंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:09 IST2021-06-29T04:09:11+5:302021-06-29T04:09:11+5:30
पुणे : स्मार्ट सिटी मिशनअंतर्गत आयोजित केलेल्या ‘क्लायमेट स्मार्ट सिटीज असेसमेंट फ्रेमवर्क २.०’ (सीएसएसीएफ) मध्ये एकूण ४ स्टार रेटिंगसह, ...

‘सीएसएसीएफ २.०’मध्ये पुण्याला सर्वाधिक रेटिंग
पुणे : स्मार्ट सिटी मिशनअंतर्गत आयोजित केलेल्या ‘क्लायमेट स्मार्ट सिटीज असेसमेंट फ्रेमवर्क २.०’ (सीएसएसीएफ) मध्ये एकूण ४ स्टार रेटिंगसह, पुणे शहराने देशातील इतर ८ शहरांसह सर्वाधिक रेटिंग मिळवून पहिल्या लीगमध्ये आपले स्थान निश्चित केले आहे.
केंद्र सरकारच्या गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालयाने २८ निर्देशाकांच्या सुधारित संचासह, हवामान स्मार्ट शहरे मूल्यांकन फ्रेमवर्क ''सीएससीएएफ २.०''मध्ये पुणे शहराला समाविष्ट केले आहे, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.
भारतीय शहरांना हवामान बदलांचा सामना करण्यासाठी दिशा देणे, हा या मूल्यांकनाचा उद्देश आहे. क्लायमेट स्मार्ट सिटीज मूल्यांकन पद्धतीत पाच विभागांतील निर्देशाकांचा समावेश आहे. यात १. ऊर्जा आणि हरित इमारती, २.नगररचना, ग्रीन कव्हर, ३.जैवविविधता, गतिशीलता, ४. वायू गुणवत्ता, जल व्यवस्थापन व ५. कचरा व्यवस्थापन या घटकांचा समावेश आहे. या मूल्यांकनामुळे शाश्वत आणि बदलत्या हवामानारूप होणाऱ्या कामांना प्रमाणपत्रच मिळाले असल्याचेही मोहोळ यांनी सांगितले.