शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

पुण्याच्या वैभवशाली विसर्जन मिरवणुकीची सुरुवात धुमधडाक्यात होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2022 16:58 IST

यंदा पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्या हस्ते महात्मा फुले मंडईतील लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुतळ्यास अर्पण

पुणे : महापालिका सभागृहाची मुदत संपल्यामुळे पुण्याचे महापौर पद रिक्त असल्याने, यंदाच्या वर्षी महापालिका आयुक्त तथा प्रशासक विक्रम कुमार यांच्या हस्ते गणेश विसर्जन मिरवणुकीची सुरुवात होणार आहे. शुक्रवारी सकाळी ९.३० वाजता महात्मा फुले मंडईतील लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुतळ्यास तसेच लोकनेते यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्यात कुमार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात येणार आहे. त्यानंतर विसर्जन मिरवणूकीस सकाळी १० वाजता प्रारंभ होईल.

महापालिकेच्या वतीने अलका टॉकीज चौकात स्वागत मंडप उभारण्यात आला असून, विसर्जन मिरवणूकीत सहभागी झालेल्या मंडळांच्या अध्यक्षांना व पदाधिकान्यांना मनपा अधिकारी तसेच खातेप्रमुख यांच्या हस्ते श्रीफळ देऊन सन्मानित केले जाणार आहे. यंदाचे वर्षी गणेशोत्सव विसर्जनाकरिता पुणे महापालिकेच्यावतीने सर्व स्तरावर आवश्यक पूर्ण तयारी करण्यात आलेली आहे. गणेशोत्सवाच्या तयारीच्या दृष्टीने १५ क्षेत्रिय कार्यालयांनी त्यांच्या परिसरातील सार्वजनिक स्वच्छता, मिरवणूक मार्गावर स्वच्छता व औषधोपचाराची व्यवस्था, ग्रुप स्विपिंग, कटेनर, निर्माल्य कलश, किटकनाशक फवारणी विसर्जन घाटांवरमल कर्मचारी व्यवस्थापन, घाटांवर औषध फवारणी, नदी किनारच्या विसर्जन घाटांवर तसेच ज्या भागात नदी, तलाव, विहीरी माहीत अशा परिसरात विसर्जन हौद, लोखंडी यांची सोय करण्यात आलेली आहे. त्याच बरोबर जीवरक्षकांच्या नियुक्त्या, सुरक्षा यंत्रणा, विद्युत जनित्र, ध्वनिक्षेपक यंत्रणा, जलवाहिनी व मलवाहिन्या यांच्या गळतीच्या ठिकाणी त्वरीत दुरुस्ती कामे करण्याकरिता स्वतंत्र कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या करणेत आलेल्या आहेत. तर आवश्यकतेनुसार मंडप, बेरिकेटस उभारण्यात आले आहेत. अलका टॉकीज चौक, महाराष्ट्र साहित्य परिषद, टिळक रोड, नारायण पेठ माती गणपतीजवळ मंडप व स्टेज टाकण्यात आले आहेत. ध्वनीक्षेपनाची व प्रकाशाची व्यवस्था करणेत आली आहे. सार्वजनिक स्वच्छतागृहे, शौचालयांची स्वच्छता, फिरती शौचालये, सुचना फलक आदी स्तरावरून तयारी करण्यात आली असल्याची माहिती महापालिकेच्या वतीने देण्यात आली.

टॅग्स :PuneपुणेGanesh Mahotsavगणेशोत्सवGanpati Festivalगणेशोत्सवganpatiगणपती