पुणे : गणेश विसर्जन शनिवारी (दि.६) मिरवणूकमध्ये टिळक रस्त्यावर शहराच्या मध्यवर्ती भागासह उपनगरातील मंडळे मोठ्या प्रमाणात सहभागी झाली. यामध्ये मार्केट यार्ड, सदाशिव पेठ, नवी पेठ, सहकारनगर, पद्मावती या भागातील जुनी मोठी मंडळे या मार्गावरून गणेश विसर्जन मिरवणुकीत सामील होत असतात.
शनिवारी विसर्जन दिवशी १ वाजल्यानंतर मंडळे स्वारगेट जेधे चौक येथून टिळक रस्त्यावर मार्गस्थ होत होते. ते दुसऱ्या दिवशी रविवारी (दि.७) दुपारी २ पर्यत १३० मंडळे उशिरापर्यत अलका चौकाकडे निघाली. पावसाच्या हलक्या सरीमध्ये बेधुंद तरुणाई, साऊंड सिस्टिमच्या दणदणाटावर थिरकणारी पावले आणि आकर्षक विद्युत रोशणाईने टिळक रस्ता परिसर उजळून निघत होता.
तरूणाईनी काठिण्य घोंगड घेऊ द्या की रे, हंगामा हो.. , नाद खुळा नाद खुळा, हृदय वसंत फुलताना प्रेमाचा रंग याने हिंदी-मराठी रिमिक्स नव्या जुन्या गाण्यांवर तरुणाई टिळक रस्त्यावर थिरकली.
- स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांचे डीजेवर नृत्य
टिळक रस्त्यावर सर्वात जास्त डीजे वाजवणारी गणेश मंडळे येत होती. यामध्ये स्पर्धा परीक्षा तयारी करणारे विद्यार्थी मुली बेधुंदपणे तरुणाई नाचत होती.
डीजे बंद, मंडळांनी रस्त्यावरच मांडले ठाण
पोलिसांनी रात्री १२ नंतर मंडळांचा डीजे बंद केल्यानंतर काही सार्वजनिक मंडळांनी रस्त्यावरच डीजे शिवाय मिरवणूक होणार नाही, म्हणून ठाम मांडून बसले. अखेर सकाळी ६ वाजता मंडळाचे कार्यकर्ते जागृत होऊन पुन्हा डीजे सुरू करून मोठ्या आवाजात नाचत मार्गस्थ झाली.