शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

Pune Ganpati Festival : विसर्जन मिरवणुकीत पारंपरिक वेशभूषा परिधान करून वादन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2025 12:21 IST

यादृष्टीने  आज  शुक्रवारी दिवसभर व रात्री उशिरापर्यंत सर्वच पथकांमध्ये लगबग पहायला मिळाली.

पुणे : गेल्या दहा दिवसांपासून सुरू असलेल्या गणेशोत्सवाची सांगता शनिवारी (दि. ६) बाप्पाच्या वैभवशाली विसर्जन मिरवणुकीने होत आहे. या मिरवणुकीत विविध ताल व ठेके वाजवण्यासाठी व गणेशभक्तांना आपल्या वादनावर ठेका धरायला लावण्यात उत्सुक आहेत. यादृष्टीने  शुक्रवारी दिवसभर व रात्री उशिरापर्यंत सर्वच पथकांमध्ये लगबग पहायला मिळाली.पुण्याच्या गणेशोत्सवात ढोल-ताशा पथके गणेशभक्तांचे प्रमुख आकर्षण असतात. शहर व उपनगरांत जवळपास १७५ ते २०० पथके असून २५ ते २७ हजार तरुण-तरुणी वादक आहेत. या ढोल पथकांचा वादन सराव गेल्या दोन ते अडीच महिन्यांपासून शहराच्या विविध भागांत सुरू आहेत. या सरावादरम्यान जुन्या व नवीन वादकांनी नवे जुने ठेके व ताल वादनाचा सराव केला आहे. ज्यासाठी वादक गेली अनेक दिवस वादनाचा सराव करत आहेत, ती बाप्पाची विसर्जन मिरवणूक आज होत आहे. सरावादरम्यान जे ठेके व ताल शिकले, ते गणेशभक्तांच्या समोर सादर करण्यासाठी वादक उत्सुक आहेत.तत्पूर्वी, शुक्रवारी दिवसभर व रात्री उशिरापर्यंत विसर्जन मिरवणुकीच्या तयारीसाठी सर्वच ढोल पथकांत लगीनघाई सुरू होती. वादक आपापले ढोल तयार करत होते. तयार केलेल्या ढोलावर स्वतःची नावे टाकून सहकाऱ्याला ढोल तयार करण्यासाठी मदत करत होते. हेच चित्र ताशावादकांमध्येही दिसत होते. तयार झालेले ढोल टेम्पोमध्ये भरण्याचीही कामे सुरू होती. पथकांचा जोर संकल्पनेवर आधारित (थीम ओरिएंटेड)ढोल पथकांकडून आजवर गाण्यांच्या चालींवर वादन करण्याकडे कल असे. मात्र, मागील दोन-तीन वर्षांपासून पथकांचा जोर हा संकल्पनेवर आधारित (एखादी थीम घेऊन) वादनावर जास्त आहे. पथकांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज, बाल शिवाजी, संभाजी महाराज, जय मल्हार, महाकाल यावर आधारित वेशभूषा व वादने केली जात आहेत. वादनामध्ये नवनवीन चाली, ताल, संबळ, दिमडी, ड्रमसेट यांचा वापर केला जात आहे.मिरवणुकीत ऐकायला मिळणार हे तालएक ते सहा, रामजी की सवारी, नवीन पोपट, महाकाल, लावणी, ताल, झी-गौरव, भांगडा, राम लखन, रावडी राठोड, भजनी, इंद्रजीमी जम्बपर, फुलगाव, तिहाई, नवीन व जुना गावठी, धमार, कावड, देवीचा ठेका, जोगन, कच्ची बाजा आणि आणखी काही.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPune Ganpati Festivalपुणे गणेशोत्सव