शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

Pune Ganpati Festival : गणेश विसर्जनासाठी पाण्यात उतरलेले चार युवक बुडाले; दोघांचा मृत, दोन जणांचा शोध सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2025 21:27 IST

या दुःखद घटनेने चाकण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

चाकण : वाकी बुद्रुक, शेलपिंपळगाव येथील भामा नदीत आणि बिरदवडी (ता. खेड) येथील विहिरीत गणपती विसर्जनादरम्यान चार युवक पाण्यात बुडल्याची धक्कादायक माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. यातील दोन जणांचा मृत्यू झाला असून दोन जणांचा शोध घेतला जात आहे. या दुःखद घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.वाकी बुद्रुक येथील प्रियदर्शन शाळेजवळील भामा नदीमध्ये अभिषेक संजय भाकरे (वय २१ वर्षे, रा. कोयाळी, ता. खेड) आणि आनंद जयस्वाल (वय २८ वर्षे, रा. उत्तरप्रदेश) हे दोघे गणपती विसर्जनादरम्यान पाण्यात बुडाले आहेत. या घटनेतील आनंद जयस्वाल याचा मृतदेह सापडला आहे, परंतु अभिषेक भाकरे याचा चाकण पोलीस, एनडीआरएफ टीम, अग्निशमन दल आणि रेस्क्यू टीमच्या माध्यमातून शोध सुरू आहे.तसेच शेलपिंपळगाव (ता. खेड) येथील भामा नदीत गणेश विसर्जन करताना रवींद्र वासुदेव चौधरी (वय ४५ वर्षे, रा. शेलपिंपळगाव) हे नदीत गणपती विसर्जन करण्यासाठी गेले असता ते नदीत वाहून गेल्याची माहिती चाकण पोलिसांनी दिली आहे.बिरदवडी (ता. खेड) येथील संदेश पोपट निकम (वय ३५ वर्षे, रा. बिरदवडी) यांचा गणेश विसर्जन करताना तोल गेल्यामुळे बुडून मृत्यू झाला आहे. चाकण पोलीस, एनडीआरएफ टीम, अग्निशमन दल आणि रेस्क्यू टीमच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आला असून पुढील कार्यवाहीसाठी मृतदेह चाकण ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे.आज संपूर्ण राज्यात गणेशोत्सवाचा जल्लोष पाहायला मिळत आहे. ठिकठिकाणच्या विहिरी, तलाव, नद्या याठिकाणी विसर्जनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होताना दिसत आहे. चाकण परिसरात गणेश विसर्जनादरम्यान दोन युवकांचा पाण्यात बुडून मृत्यूची दुर्दैवी घटना घडल्याने परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे, तर दोन जण पाण्यात वाहून गेल्याची घटना समोर आली आहे.पोलिसांकडून आवाहन करूनही अनेकजण नदीपात्रातभामा नदीसह परिसरातील तलाव, तळी आणि विहिरीत गणपती विसर्जन करताना उतरू नये, असे आवाहन चाकण आणि महाळुंगे एमआयडीसी पोलिसांकडून करण्यात आले आहे. परंतु तरीही काही जणांकडून नदीपात्रात जाऊन विसर्जन करण्याचे धाडस केले जात आहे. नदीत उतरून गणेश विसर्जन करण्याचे हे धाडस दोन जणांच्या जिवावर बेतले आहे.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPune Ganpati Festivalपुणे गणेशोत्सव