शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

गुंड विठ्ठल शेलारची 'बुलेटप्रुफ स्कॉर्पिओ' गुन्हे शाखेने पकडली, शरद मोहोळ खूनप्रकरणात ६ महागड्या गाड्या जप्त 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2024 22:04 IST

Pune News: गँगस्टर शरद मोहोळ खून प्रकरणात पुणे पोलिसांनी अटक केलेल्या गुंड विठ्ठल शेलारची बुलेटप्रूफ स्कॉर्पिओ गाडी जप्त करण्यात आली आहे. पांढऱ्या रंगाची ही स्कॉर्पिओ गाडी विठ्ठल शेलार ने त्याच्या पुनावळे येथील फार्म हाऊसवर लपवून ठेवली होती.

- किरण शिंदेगँगस्टर शरद मोहोळ खून प्रकरणात पुणे पोलिसांनी अटक केलेल्या गुंड विठ्ठल शेलारची बुलेटप्रूफ स्कॉर्पिओ गाडी जप्त करण्यात आली आहे. पांढऱ्या रंगाची ही स्कॉर्पिओ गाडी विठ्ठल शेलार ने त्याच्या पुनावळे येथील फार्म हाऊसवर लपवून ठेवली होती. मात्र गुन्हे शाखेच्या पोलिसांना या गाडी विषयी माहिती मिळाल्यानंतर त्यांनी ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू केली होती. तोपर्यंत विठ्ठल शेलार च्या साथीदारांनी ही गाडी इतरत्र हलवण्याचा प्लॅन केला होता. विठ्ठलचे साथीदार ही गाडी घेऊन निघालेही होते. मात्र पोलीस आपल्या मार्गावर असल्याचे समजल्यानंतर त्यांनी गाडी रस्त्यात सोडून पळ काढला. त्यानंतर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ही कार जप्त केली आहे. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी या प्रकरणात आतापर्यंत सहा महागड्या कार जप्त केल्या आहेत.

शरद मोहोळ खून प्रकरणात पुणे पोलिसांनी आतापर्यंत 15 जणांना अटक केली आहे. अटकेत असलेल्या आरोपींच्या ताब्यातून पोलिसांनी आतापर्यंत क्रेटा, इंनोव्हा, फॉर्च्युनरसह ६ कार जप्त केल्या आहेत. आरोपींच्या गाड्यांविषयी माहिती घेत असतानाच पोलिसांना विठ्ठल शेलारच्या बुलेटप्रुफ कार विषयी माहिती मिळाली होती. मात्र पोलीस ही गाडी जप्त करतील या भीतीने त्यांनी लपून ठेवण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू केल्या होत्या. 

मात्र पोलिसांना याची काही वेळातच माहिती मिळाली व पोलिसांनी तिचा पाठलाग सुरू केला. वाकड भागात ही कार आली असतानाच या कार घेऊन जाणाऱ्याना पोलीस मागावर असल्याचीही माहिती मिळाली. त्यांनी लागलीच कार रस्त्याच्या बाजूला सोडत पळ काढला. त्यानंतर पोलिसांनी ही कार ताब्यात घेतली.

दरम्यान, कुख्यात गँगस्टर शरद मोहोळ याचा ५ जानेवारी रोजी त्याच्या राहत्या घराजवळ खून करण्यात आला होता. मुन्ना पोळेकर आणि त्याच्या साथीदारांनी गोळ्या झाडून खून केला होता. याप्रकरणात आता पर्यंत १५ आरोपीना अटक करण्यात आली आहे. तसेच ८ ते ९ जणांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी करण्यात येत आहे. शरद मोहोळचा खून होण्यापूर्वी एक महिना आधी विठ्ठल शेलार आणि पाहिजे आरोपी गणेश मारणे यांच्यात मिटिंग झाल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. गणेश मारणे टोळीचा सदस्य असलेला विठ्ठल शेलार हा मुळचा मुळशी तालुक्यातील उरवडे गावचा रहिवासी आहे. त्याच्यावर खून, खूनाचा प्रयत्न, अपहरण आणि खंडणीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. २०१४ मध्ये त्याच्यावर मोक्काअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच त्याला अटकही झाली होती. २०१७ मध्ये त्याची जामीनावर सुटका करण्यात आली होती.

शरद मोहोळ याचे वर्चस्व मुळशी व परिसरात वाढले होते. कंपन्यांमधील कंत्राटे घेण्यावरुन शेलार आणि मोहोळ यांच्यात कुरुबुरी सुरु होत्या. काही महिन्यांपूर्वी मुंबई बंगलुरु महामार्गावरील राधा हॉटेल चौकात त्याने गोळीबार ही केला होता. विठ्ठल शेलार हा सुरुवातीपासून पोलिसांच्या रडारवर होता. शरद मोहोळचा खून झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी तो गुन्हे शाखेत हजर झाला होता. त्यानंतर तो फरार झाला होता. त्याला पहाटे पनवेलहून ताब्यात घेतले आहे.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारी