एचआयव्हीच्या विळख्यातून मुक्त होतेय पुणे

By Admin | Updated: January 1, 2015 00:51 IST2015-01-01T00:51:10+5:302015-01-01T00:51:10+5:30

दशकापूर्वीपर्यंत ज्या आजाराने जगभरात भीती पसरवली होती, त्या एचआयव्हीच्या विळख्यातून पुणे मुक्त होत असल्याचे आशादायक चित्र दिसून येत आहे.

Pune is free from HIV infection | एचआयव्हीच्या विळख्यातून मुक्त होतेय पुणे

एचआयव्हीच्या विळख्यातून मुक्त होतेय पुणे

राहुल कलाल - पुणे
दशकापूर्वीपर्यंत ज्या आजाराने जगभरात भीती पसरवली होती, त्या एचआयव्हीच्या विळख्यातून पुणे मुक्त होत असल्याचे आशादायक चित्र दिसून येत आहे. गेल्या दोन वर्षांत पुण्यातील एड्सग्रस्तांची संख्या घटत असल्याचे दिसून आले आहे.
पुण्यात एचआयव्हीचा संसर्ग होण्याचे प्रमाणही खूप होते. २०१३ मध्ये २ हजार २७१ जणांना एचआयव्हीचा संसर्ग झाला होता. हे प्रमाण कमी करण्यासाठी समाजात व्यापक प्रमाणात जनजागृती मोहिमा राबविण्यात आल्या. त्यामुळे २०१४ या वर्षात हे प्रमाण झपाट्याने घटून १ हजार ५५८ रुग्णांपर्यंत खाली आहे.
या आजाराबाबत जनजागृती झाल्याने ही संख्या घटत असल्याचे चित्र आहे. हे सकारात्मक चित्र तयार करण्यामध्ये सरकारी स्तरावरील योजनांसह स्वयंसेवी संस्थांचा मोठा सहभाग आहे. सन २०१३ मध्ये महिन्याकाठी अडीचशे ते तीनशे रुग्ण शहरात सापडत होते. मात्र, २०१४ मध्ये हे प्रमाण घटून दोनशेच्या घरांमध्ये आले.

चांगल्या उपचारामुळे वयोमानही वाढले
एचआयव्ही पूर्णपणे बरा होणारे औषध अजूनही विकसित करण्यात न आल्याने एचआयव्हीने मृत्यू होणाऱ्यांचे प्रमाण दशकापूर्वी खूप मोठे होते. मात्र, विविध औषधांचा वापर उपचारामध्ये वाढला. या औषधांमुळे एचआयव्हीची लागण झालेल्या रुग्णांचे वयोमान वाढले आहे.

समाजाची स्वीकारण्याची क्षमता वाढतेय
एड्सग्रस्त व्यक्तीशी कोणीही बोलत नव्हते. त्यांना समाजातून बहिष्कृत केले जात होते. मात्र, हा आजार हात लावण्याने पसरत नसल्याबाबत जनजागृती झाल्याने एड्सग्रस्त लोकांना स्वीकारण्याची क्षमता वाढत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

Web Title: Pune is free from HIV infection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.