शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

पुणे : बारा हजार अधिकारी-कर्मचारी रजेवर, विक्रीकर भवनमध्ये शुकशुकाट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2018 17:53 IST

विक्रीकर व सध्याच्या वस्तू व सेवाकर विभागाचा कणा समजल्या  जाणाऱ्या विक्रीकर अधिकाऱ्यांच्या वेतन श्रेणीचा प्रश्नावर आतापर्यंत आश्वासनाशिवाय काहीही हाती लागले नाही. त्यामुळे राज्यातील 12 हजार राजपत्रित अधिकारी, कर्मचाऱ्यांनी दोन दिवसांचे  सामूहिक रजा आंदोलन करत आहे.

पुणे : विक्रीकर व सध्याच्या वस्तू व सेवाकर विभागाचा कणा समजल्या  जाणाऱ्या विक्रीकर अधिकाऱ्यांच्या वेतन श्रेणीचा प्रश्नावर आतापर्यंत आश्वासनाशिवाय काहीही हाती लागले नाही. त्यामुळे राज्यातील 12 हजार राजपत्रित अधिकारी, कर्मचाऱ्यांनी दोन दिवसांचे  सामूहिक रजा आंदोलन करत आहे. त्यामुळे शासनाने हा प्रश्न लवकरात लवकर सोडवणे आवश्यक आहे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य विक्रीकर राजपत्रित अधिकारी संघटनेचे सदस्य डॉ. संदीप शिंदे यांनी केली आहे.गट-ड संवर्गासह सर्व संवर्गातील रिक्त पद तात्काळ भरा, विभागातील वेतन त्रुटीचे प्रश्न सत्वर मार्गी लावावे, राज्यकर सहआयुक्त आणि राज्यकर उपआयुक्त संवर्गातील कुटिलता दूर करावी, सेवा भरती नियमांमध्ये बदल करताना संघटनाना विश्वासात घावे, वस्तू व सेवा कर विभागात केंद्राच्या धर्तीवर समान काम, समान पदे आणि समान वेतन ही त्रिसूत्री लागू करावी, तसेच विभागीय संवर्ग वाटप व संघटना अधिनियमधून राज्यकर विभागास कायमस्वरूपी सूट ध्यावी, आदी प्रमुख सहा मागण्यांसाठी हे आंदोलन इतिहासात पाहिल्यादाच करण्यात येत आहे, असे संघटनेचे राज्य सहखजिंदार नंदकुमार सोरटे, पुणे उपाध्यक्ष रमेश फडतरे, पुणे सहसचिव चंद्रकांत मंचर, राजपत्रित संघटना सदस्य डॉ. संदीप शिंदे, कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष दिनेश कारके, सरचिटणीस श्रद्धा मुंढे, गट - ड संघटनेचे सरचिटणीस शिवाजी थिटे आणि मध्यवर्ती कर्मचारी संघटनेचे उपाध्यक्ष आप्पा वीर आदी पदाधिकार्यांनी सांगितले.डॉ. संदीप शिंदे म्हणाले, जीएसटीच्या पार्श्वभूमीवर अधिकाऱ्यांच्या व कर्मचाऱयांच्या वेतन श्रेणीचा प्रश्न शासनाने त्वरित सोडवणे आवश्यक आहे. मागील काही वर्षात अनेक वेळा शासन दरबारी आम्ही या मागण्यांबाबत पाठपुरावा केला होता. मात्र त्याची शासनाने दखल घेतली नाही. त्यामुळे इतिहासात पहिल्यांदा आम्ही दोन दिवस सामूहिक रजा आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शासनाने आता तरी योग्य दखल घ्यावी. अन्यथा यापुढे आणखी तीव्र आंदोलन करण्यात येणार आहे.  

टॅग्स :PuneपुणेStrikeसंप