पुण्याची ‘फॅशन पेठ’ आता बारामतीमध्ये!
By Admin | Updated: January 21, 2015 23:13 IST2015-01-21T23:13:13+5:302015-01-21T23:13:13+5:30
पुण्यातील सुप्रसिद्ध ‘सिलाई’ने आता बारामतीमध्ये पदार्पण केले असून, त्यांच्या ‘सिलाई वर्ल्ड’ या दालनाचे उद्घाटन अजितदादा पवार यांच्या हस्ते येत्या २५ तारखेला होणार आहे.

पुण्याची ‘फॅशन पेठ’ आता बारामतीमध्ये!
पुण्यातील सुप्रसिद्ध ‘सिलाई’ने आता बारामतीमध्ये पदार्पण केले असून, त्यांच्या ‘सिलाई वर्ल्ड’ या दालनाचे उद्घाटन अजितदादा पवार यांच्या हस्ते येत्या २५ तारखेला होणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रात ‘सिलाई’ आणि ‘सिल्व्हर लीफ’ ही दोन्ही शोरूम्स सुप्रसिद्ध आहेत.
पुण्यात असणाऱ्या या पुरुषांच्या वस्त्रविश्वात खरेदी करण्यासाठी बारामतीकर मोठ्या प्रमाणात येत असतात. म्हणूनच बारामतीकरांना खास सेवा देण्यासाठी ‘सिलाई वर्ल्ड’ हे अनोखे वस्त्रविश्वच आता बारामतीमध्ये येत आहे.
केवळ पुरुषांसाठीच नव्हे, तर घरातल्या सर्वांसाठी हे भव्य दालन सर्व प्रकारे सुसज्ज झाले आहे. नावाप्रमाणेच वैविध्यपूर्ण वस्त्रांची अनोखी दुनिया इथे बारामतीकरांना पाहायला मिळणार आहे. यामध्ये पारंपरिक पोषाखांपासून ते वेस्टर्न वेअरमध्ये विविध प्रकारच्या व्हरायटिज् उपलब्ध असणार आहेत. सध्याच्या ‘फॅशन’च्या युगाला साजेशी ही वस्त्रप्रावरणे बारामतीकरांच्या व्यक्तिमत्त्वाला आणखीनच उठाव देणारी आहेत.
कपड्यांसोबतच विविध प्रकारच्या अॅक्सेसरीज, मोबाईल व फुटवेअर्सचा देखील यामध्ये समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे संपूर्ण परिवाराची सर्व खरेदी इथे एकाच छताखाली होणार आहे. बारामतीमध्ये भिगवण रोडवरील ‘सिलाई वर्ल्ड’ हे भव्य शोरूम बारामतीकरांची मने जिंकून घेईल, असा विश्वास ‘सिलाई वर्ल्ड’चे संचालक सागर गुजर यांनी व्यक्त केला.