पुणे जिल्ह्यात महिलांपेक्षा पुरुषांना उच्च रक्तदाबाचा त्रास जास्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:27 IST2021-01-08T04:27:41+5:302021-01-08T04:27:41+5:30
उच्च रक्तदाबाची लक्षणे ताबडतोब दिसत नसली तरी त्याचा शरीरावर विपरित परिणाम होत असतो. त्यामुळेच उच्च रक्तदाबाला ‘सायलंट किलर’ असे ...

पुणे जिल्ह्यात महिलांपेक्षा पुरुषांना उच्च रक्तदाबाचा त्रास जास्त
उच्च रक्तदाबाची लक्षणे ताबडतोब दिसत नसली तरी त्याचा शरीरावर विपरित परिणाम होत असतो. त्यामुळेच उच्च रक्तदाबाला ‘सायलंट किलर’ असे म्हटले जाते. मागील पाच वर्षांत रक्तदाबाच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयातर्फे राष्ट्रीय कुटुंब सर्वेक्षण अहवाल सादर केला. त्यानुसार जिल्ह्यामध्ये स्त्रियांच्या तुलनेत पुरुषांचे प्रमाण जास्त आहे, असा निष्कर्ष निघाला आहे.
उच्च रक्तदाब इतर अनेक आजारांना कारणीभूत ठरतो. मधुमेह, रक्तदाबाशी संबंधित समस्या यांसारख्या आजारांनी पीडित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. वेळीच निदान न झाल्यास आणि उपचार न घेतल्यास उच्च रक्तदाब पाचवीला पुजतो. त्यामुळे आरोग्याकडे दुर्लक्ष करु नये, असे आवाहन तज्ज्ञांकडून केले आहे.
---
महिला पुरुष
सौम्य रक्तदाब १४.३ १६.१
गंभीर रक्तदाब ३.७ ६.४
तीव्र रक्तदाब २२.४ २५.८
(सर्व प्रमाण टक्क्यांत)
---
रक्तदाब वाढण्याची कारणे :
- अनुवंशिकता हे उच्च रक्तदाबामागील मुख्य कारण आहे. आपल्या मागील पिढ्यांना हा त्रास असल्यास आपल्यालाही त्रास उदभवण्याची शक्यता असते.
- अतिप्रमाणात धुम्रपान, मद्यपान
- आहाराच मिठाचा अतिवापर, जंक फूडचे सेवन
- ताणतणाव, बैैठी जीवनशैैली, व्यायमाचा अभाव
- लठ्ठपणा
--
काय काळजी घ्यावी?
- जेवणात मिठाचा अतिरेक टाळावा.
- धुम्रपान, मद्यपान, तंबाखूचे सेवन टाळावे
- वजन संतुलित राखण्यावर भर असावा.
- आहारात पालेभाज्या, कच्च्या भाज्या, कडधान्ये यांचे प्रमाण वाढवावे
- व्यायाम आणि योगासनांवर भर द्यावा
---
बदललेली जीवनशैैली, धावपळ अनेक आजारांना आमंत्रण देत आहे. स्त्री, पुरुष सर्वांनीच आरोग्याकडे दुर्लक्ष करणे टाळले पाहिजे. नियमित तपसण्या, डॉक्टरांचा सल्ला यावर भर द्यावा. दैैनंदिन वेळापत्रक आखून त्याप्रमाणे व्यायाम, आहार, शारीरिक आणि मानसिक आरोग्य राखण्याचा प्रयत्न करावा.
- डॉ. कविता डोके, जनरल फिजिशियन