पुणे जिल्ह्यात पुन्हा निवडणूक रणधुमाळी
By Admin | Updated: September 30, 2015 01:01 IST2015-09-30T01:01:08+5:302015-09-30T01:01:08+5:30
नोव्हेंबर व डिसेंबर २०१५ दरम्यान मुदत संपणाऱ्या पुणे जिल्ह्यातील ४७ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक व ४५ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे

पुणे जिल्ह्यात पुन्हा निवडणूक रणधुमाळी
पुणे : नोव्हेंबर व डिसेंबर २०१५ दरम्यान मुदत संपणाऱ्या पुणे जिल्ह्यातील ४७ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक व ४५ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. नगर परिषदांबरोबरच आता
पुन्हा एकदा जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी रंगणार
आहे. यामध्ये माळेगाव बुद्रुक, मणेरवाडी, धनगरवाडी, शिरोली
खुर्द, येडगाव, भिगवण, राक्षेवाडी
या काही मोठ्या ग्रामपंचायतींचा समावेश आहे.
जिल्ह्यात नुकत्याच तब्बल ७०३ ग्रामपंचायतींच्या निवडणुका पार पडल्या आहेत. आता आॅक्टोबर महिन्यात पुन्हा ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी रंगणार आहे. (प्रतिनिधी)
-----------
निवडणुका होणाऱ्या तालुकानिहाय ग्रामपंचायती
बारामती : मळद, माळेगाव बु., पाहुणेवाडी, कन्हेरी. भोर : गोकवडी, पेजाळवाडी, कासुर्डी खे.बा, आळंदेवाडी. दौंड : बोरीऐंदी. हवेली : नायगाव, पेठ, शिंदेवाडी, बहुली, मणेरवाडी, हिंगणगाव, न्हावी सांडस. इंदापूर : भिगवण, सराफवाडी. जुन्नर : बस्ती, धनगरवाडी, शिरोली खुर्द, येडगाव, खेड-बिबी, ढोरे भांबुरवाडी, नायफड, राक्षेवाडी, आखरवाडी, जायकवाडी, शिरगाव, धामणगाव खुर्द. मावळ : गोवित्री, इंगळूण, कांबरे, आंबेगाव, कुसवली, माळवाडी.
मुळशी : बोतरवाडी, उरावडे, चिंचवड. पुरंदर : बोऱ्हाळवाडी, पिंपळे, पिंपरी, निळुंज. शिरूर : निमगाव दुडे, रावडेवाडी, दरेकरवाडी, डिग्रजवाडी.