शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक रात्री उघडी; माळेगावच्या निवडणुकीत पैशांच्या वाटपाचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2025 14:00 IST

- बारामतीतील राजकारण पेटलं; पाटबंधारे खात्याचे अधिकारी डूबल पळून गेल्याचे प्रत्यक्षदर्शनी सांगितले वरील सर्व घटना अजित पवार यांच्या आशीर्वादानेच होत असल्याचा दावा सहकार बचाव पॅनलकडून करण्यात आला आहे.

बारामती : माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बारामतीत राजकीय घडामोडींना वेग आला असून,आता पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक चर्चेत आली आहे.बारामती शहरातील आमराई भागातील जिल्हा बँक रात्री तब्बल ११ वाजेपर्यंत सुरु होती.या ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर माळेगाव कारखान्याशी संबंधित मतदार याद्या आणि पैशांच्या वाटपाचं प्लॅनिंग केलेली कागदपत्रे मिळून आल्याने खळबळ माजलेली दिसत होती. यावेळी पाटबंधारे खात्याचे अधिकारी डूबल पळून गेल्याचे प्रत्यक्षदर्शनी सांगितले वरील सर्व घटना अजित पवार यांच्या आशीर्वादानेच होत असल्याचा दावा सहकार बचाव पॅनलकडून करण्यात आला आहे.बारामती शहरातील आमराई येथील जिल्हा बॅंकेची मुख्य शाखा बुधवारी रात्री उशीरापर्यंत सुरु होती. ही माहिती मिळाल्यानंतर सहकार बचाव शेतकरी पॅनलचे प्रमुख नेते रंजनकुमार तावरे आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने या ठिकाणी दाखल झाले.यावेळी रंजनकुमार तावरे यांनी माळेगाव कारखाना निवडणुकीसाठी तयार केलेल्या याद्या मिळून आल्याचं सांगत या बॅंकेतून मतदारांना पैशांचं वाटप केलं जात असल्याचा आरोप केला आहे. तसेच रंजनकुमार तावरे यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पीए सुनील मुसळे आणि मंत्री दत्तात्रय भरणे यांचे सहकारी घटनास्थळी उपस्थित असल्याचा दावा केला आहे.सुनील मुसळे हे आमच्या समोरून गाडीतून गेले.अकरा वाजता जिल्हा बँकेत त्यांचं नेमकं काय काम होतं..? असा सवाल उपस्थित करत माळेगावच्या निवडणुकीत वाटपासाठी पैशांची पाकीटं भरण्याचं काम इथे सुरु होते, असा दावा त्यांनी केला. अजित पवार पैशाच्या मस्तीवर  सभासदांना खरेदी करण्याचा केविलवाना प्रकार करतायेत.आम्ही या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी,गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी करत आहोत.सभासद, त्यांचे नातेवाईक आणि यामागे जबाबदार व्यक्तींची नावं अशी यादीच या ठिकाणी मिळून आली आहे.अशा पद्धतीने याद्या तयार करण्यामागचे गौडबंगाल नेमके काय असा प्रश्न तावरे यांनी उपस्थित केला.  शासकीय यंत्रणेचा गैरवापर ?डूबल नावाचे जलसंपदा विभागाचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियरही या घडामोडीत सहभागी आहेत.ते बारामतीतच मुक्काम ठोकून पाणी वापर संस्थांवर दबाव टाकत होते. ज्यांनी मदत केली नाही त्यांचं पाणी बंद करण्याची धमकी देण्यात आली.माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीत शासकीय अधिकाऱ्यांची भूमिका काय असा प्रश्न विचारत रंजनकुमार तावरे यांनी तीव्र संताप व्यक्त केला.त्याचबरोबर, काही शिक्षक आणि अंगणवाडी सेविकांनाही या निवडणुकीत कामाला लावल्याचा आरोप त्यांनी केला आहे.या सगळ्या प्रकाराबाबत निवडणूक आयोगाकडे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार करणार असल्याचं तावरे यांनी स्पष्ट केले आहे.या संपूर्ण प्रकाराचा CCTV फुटेज आम्हाला द्यावेत अशी मागणीही त्यांनी केली. दरम्यान या घटनेची माहिती मिळाल्यानंतर रात्री उशिरा पोलिस घटनास्थळी आले होते सहकार बचाव शेतकरी पॅनलच्या या आरोपांमुळे बारामतीतील राजकारण अधिकच तापले असून जिल्हा बँक संशयाच्या भवऱ्यात सापडली असून या बँकेवरती संशयाचे वलय तयार झाले आहे. या प्रकरणावर आता काय कारवाई होते, याकडे सभासदांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रBaramatiबारामतीElectionनिवडणूक 2024