शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

शेणखताला सोन्याचा भाव, शेतकरी मालामाल, शेती कामांना वेग

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2025 17:15 IST

शेतकऱ्यांनी राखलेल्या शेणखतालादेखील चांगली मागणी वाढली आहे.

नीरा : शेती पिकांना रासायनिक खतांची मात्रा दिल्यानंतर पीक जोमात येते हे खरे असले, तरी रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे जमिनीचा पोत बिघडतो आणि पुढे शेतीमधून निघणारे उत्पन्नदेखील समाधानकारक मिळत नाही. त्यामुळे आता अनेक शेतकऱ्यांची पावले पुन्हा नैसर्गिक आणि विषमुक्त शेतीकडे वळताना दिसून येत आहेत. यासाठी शेतकरी शेणखतांचा वापर करताना दिसत आहेत. यामुळे शेतकऱ्यांनी राखलेल्या शेणखतालादेखील चांगली मागणी वाढली आहे. एक मोठी ट्रॉली शेणखतासाठी ४ ते ६ हजार रुपये मोजावे लागत आहेत.

दरवर्षी गुढीपाडवा झाला की, शेतकरी नव्याने शेती नांगरट करणे, पलटी मारणे, रोटर फिरवणे, तापलेल्या शेतातून गवत, काडी वेचून एका ठिकाणी जमा करणे, अशा शेतीच्या मशागतीच्या कामांना वेग आलेला असतो. सोबतच शेतामध्ये शेणखत टाकणे, शेळ्या-मेंढ्या बसवणे अशी कामे सुरू असतात. दिवसेंदिवस रासायनिक खतांच्या किमती वाढत आहेत. महागडे खत घेण्यास शेतकरी धजावत नाहीत. तसेच रासायनिक खताने जमिनीचा पोत खराब होतो. यामुळे बहुंताश शेतकरी आता शेणखत घालण्यास प्राधान्य देत आहेत.

एकदा शेतात शेणखत टाकले की, किमान तीन वर्षे शेती चांगली पिकते, तसेच जमीन भुसभुशीत होऊन पाण्याचा योग्यप्रकारे निचरा होतो. परिणामी उत्पन्नातदेखील वाढ होते, असा अनेक शेतकऱ्यांचा अनुभव आहे. एक ट्रॉली शेणखतासाठी ५ हजार रुपये आणि भरण्यासाठी ७०० रुपये मजुरी, असे किमान ५ हजार ७०० रुपये मोजावे लागतात, तर एक हायवा टिप्परसाठी २२ हजार रुपये मोजावे लागतात. स्थानिकांना गावात शेणखत मिळत नसल्याने अनेक शेतकरी इतर ठिकाणांहून शेणखत विकत आणत आहेत.

१२ हजार रुपयाला शेणखताच्या दोन ट्रॉली 

अनेक शेतकरी नैसर्गिक व विषमुक्त शेती करण्यावर अधिक भर देत आहेत. त्यामुळे शेणखताला चांगली मागणी वाढली असून, शेतकऱ्यांना चांगली कमाई होते. १२ हजार रुपयाला शेणखताच्या दोन ट्रॉली घ्याव्या लागत आहेत.

शेतीसाठी चार ट्रॅक्टर शेणखत विकत घेतले आहे. दरवर्षी शेणखताचे भाव वाढतच आहेत; परंतु रासायनिक खतापेक्षा शेणखत चांगलेच असून, एकदा शेतात टाकले की, किमान तीन वर्षे जमिनीचा पोत चांगला राहतो व उत्पन्नात वाढ होऊन पिकावर रोगराईचे प्रमाण कमी राहते. - ज्ञानेश्वर निगडे, शेतकरी 

माझ्याकडे लहान-मोठ्या १४ गायी आहेत. मुक्तसंचार गोठा असल्याने शेणखतात पालापाचोळा नसतो. या जनावरांच्या शेणखतापासून चांगली मिळकत होते. दोन वर्षांपासून शेतकरी शेणखताला मोठी मागणी करतात; परंतु पशुधन सांभाळणे अवघड झाले आहे. चाऱ्याचे भाव गगनाला भिडले आहेत. यावर्षी १२ ट्रॉली शेणखत विकले आहे. वर्षभरातून तीन वेळा शेणखत विक्री होते. त्यातूनच चांगली कमाई झाली आहे. - प्रवीण निगडे, शेणखत विक्रेते 

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रAgriculture Sectorशेती क्षेत्रAgriculture Schemeकृषी योजना