शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

पुण्याचा साथीच्या आजारांशी सामना पेशवाईपासून; प्लेगच्या आधी व्हायचा देवी रोगाचा घाला

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2020 12:58 PM

पेशव्यांनी टोचून घेतली होती लस

ठळक मुद्देप्लेग , देवी, स्वाईन फ्ल्यू ते कोरोना

राजू इनामदार- पुणे : पुण्यात साथीच्या आजारांची सुरुवात पेशवाईच्या आधीपासूनची आहे. पेशवाईत देवीच्या आजाराची साथ यायची. इंग्लंडमध्ये या आजारावर निघालेल्या लशीचा वापर प्रभावी ठरल्याने त्या वेळच्या पुण्यातील इंग्रज रेसिडंटने ही लस तिथून मागवली व ती पेशव्यांच्या कुटुंबीयांनीही टोचून घेतली होती. तत्पूर्वी ही लस पुण्यात आणणारा डॉ. कोट्स याचे शनिवारवाड्यासमोर लस कशी उपयुक्त आहे, यावर व्याख्यान झाले होते.पुणे म्हटले, की बहुतेकांना प्लेगची साथच आठवते. त्याच्याशी रँड या इंग्रज अधिकाऱ्याचे जुलूम व त्यानंतर चापेकर बंधूंनी केलेला त्याचा खून या गोष्टी जोडल्या गेल्यामुळे ते स्वाभाविकच आहे. तसेच, सन १८९६ पासून ते सन १९११ पर्यंत दर वर्षी पुण्यात प्लेग येतच होता व त्यात शब्दश: हजारो नागरिक मृत्युमुखी पडत होते. मात्र, त्याच्याही आधीपासून पुणेकर नागरिक साथीच्या आजारांचा सामना करीत आहेत. त्यात तत्कालीन राज्यकर्त्यांचा व त्यानंतर १८५६मध्ये स्थापन झालेल्या नगरपालिकेचा फार मोठा वाटा आहे.नगरपालिका स्थापन होण्याच्या आधी किमान ६० वर्षे आधी म्हणजे सन १७९८मध्ये पुण्यात पेशवाईचा अंतिम श्वास सुरू होता. त्याच्याही आधीपासून पुण्यात देवीच्या रोगाची साथ यायची. जगभरात त्या वेळी या आजाराने असेच थैमान घातले होते. १७९८मध्येही अशीच साथ आली. त्याआधी सन १७९६मध्ये इंग्लंडमध्ये काही डॉक्टरांनी गाईच्या कासेवरील फोडांपासून या आजारावर लस तयार केली होती व त्याचा उपयोग झाला होता. युरोपात त्या वेळी या लशीचा बराच बोलबाला होऊन वापरही सुरू झाला होता.याची माहिती असलेला डॉ. कोट्स हा अधिकारी त्या वेळी पुण्यात आला होता. त्याने पुण्यात देवीचा आजार झालेला पाहिला. महिला व मुलांना होत असलेला त्रास त्याला पाहवेना. त्यामुळे त्याने इंग्लंडहून ही लास मागवली. पेशव्यांचे सहकार्य मागितले. त्यांनी त्याला शनिवारवाड्यासमोर या लशीच्या उपयोगाविषयी व्याख्यान द्यायला लावले. त्याने ते दिलेही. ऐकायला गर्दी झाली; पण लोकांचा विश्वास बसेना. त्यामुळे त्याने शेवटी ही लस त्यांच्यासमोर स्वत:ला टोचून घेतली. ..........डॉ. कोटकांच्या प्रयत्नामुळे पुणेकरांची खात्री डॉ. कोट्स याने स्वत:वर केलेल्या या प्रयोगामुळे मात्र पुणेकरांची खात्री पटली व त्यांनी लस टोचून घ्यायला संमती दिली. त्यानंतर त्यानेच नाही तर पेशव्यांच्या कुटुंबीयांनीही ही लस टोचून घेतली. त्यांनाही त्याचा उपयोग झाला. ४याची माहिती काही पुणेकरांना समजल्यानंतर त्यांनी ‘देवीच्या दोन फुल्या कमी पडतात; चार फुल्या मारा,’ असा आग्रह धरणे सुरू केले. त्यानंतरही देवीच्या आजाराने पुण्याचा पिच्छा सोडला नाही. सन १८५६मध्ये नगरपालिका स्थापन झाली, त्यानंतर पुढची शंभर वर्षे म्हणजे सन १९५६पर्यंत कमीअधिक फरकाने ही साथ येतच होती.४ नगरपालिकेने व नंतर सन १९५०मध्ये स्थापन झालेल्या महापालिकेने परिश्रमपूर्वक या आजारावर मात केली व पुणे देवी आजारमुक्त झाले.   

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्याPeshwaiपेशवाई