पुणे-दौंड विद्युत लोकल वर्षभरात धावेल
By Admin | Updated: April 29, 2017 04:00 IST2017-04-29T04:00:30+5:302017-04-29T04:00:30+5:30
पुणे ते दौंडदरम्यान साधारणत: वर्षभरात विद्युत लोकल धावेल, असा विश्वास खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.

पुणे-दौंड विद्युत लोकल वर्षभरात धावेल
दौंड : पुणे ते दौंडदरम्यान साधारणत: वर्षभरात विद्युत लोकल धावेल, असा विश्वास खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.
खुटबाव (ता. दौंड) येथील रेल्वेस्थानकात प्लॅटफॉर्मच्या बांधकाम भूमिपूजनप्रसंगी त्या बोलत होत्या.
खुटबाव, कडेठाण, मांजरी या तीन रेल्वेस्थानकात नव्याने प्लॅटफॉर्म उभारणीसाठी ६ कोटी रुपये रेल्वे प्रशासनाने मंजूर केले आहेत. पुणे ते दौंडदरम्यानच्यारेल्वेस्थानकात लोकलसाठी उपयुक्त असे प्लॅटफॉर्म आहेत. मात्र मांजरी, कडेठाण, खुटबाव येथे लोकलला उपयुक्त असे प्लॅटफॉर्म नसल्याने विद्युतीकरण होऊनदेखील विद्युत लोकल सुरू करता येत नाही. तेव्हा खुटबाव, मांजरी, कडेठाण या रेल्वेस्थानकात प्लॅटफॉर्म उभारणीसाठी केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केल्याने प्लॅटफॉर्मसाठी ६ कोटी रुपये मंजूर झाले आहेत. परिणामी प्लॅटफॉर्मचे बांधकाम पूर्ण होताच तातडीने या मार्गावर विद्युत लोकल धावेल, असे सुळे म्हणाल्या.
या वेळी प्लॅटफॉर्म उभारणीचे ठेकेदार म्हणाले, की साधारणत: ९ महिन्यांत कडेठाण, खुटबाव, मांजरी प्लॅटफॉर्म उभारणीचे काम पूर्णत्वाकडे जाईल.
या वेळी माजी आमदार रमेश थोरात, सभापती मीना धायगुडे, सरपंच शिवाजी थोरात, अप्पासाहेब पवार, वीरधवल जगदाळे, राणी शेळके, मधुकर दोरगे, नितीन दोरगे, सोहेल खान, योगिनी दिवेकर, सरपंच अरुणा दिवेकर, रामदास दिवेकर, महेश भागवत, लक्ष्मण दिवेकर, रामभाऊ टुले, मनोज काकडे, उद्धव फुले, राजू उगले, अलोक उगले, भाऊसाहेब ढमढेरे, प्रवीण शिंदे, सुनील फरगडे, लक्ष्मण सातपुते, कमल परदेशी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. तसेच कडेठाण (ता. दौंड) रेल्वेस्थानकात भूमिपूजन करण्यात आले. (वार्ताहर)