शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

Pune Crime| वडगाव मावळमध्ये पिस्तूलसह तरुणाला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2022 13:40 IST

वडगाव मावळ ( पुणे ) : बेकायदेशीरपणे गावठी पिस्तूल बाळगल्याप्रकरणी पुणे ग्रामीणचे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने एकाला अटक केली आहे. ...

वडगाव मावळ (पुणे) : बेकायदेशीरपणे गावठी पिस्तूल बाळगल्याप्रकरणी पुणे ग्रामीणचे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने एकाला अटक केली आहे. त्याच्याकडून गावठी बनावट पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. ही कारवाई सोमवारी सायंकाळी वडगाव मावळ बाजारपेठ रोड येथे करण्यात आली.

स्वप्नील किसन मुऱ्हे (वय ३३ रा. सोमाटणे फाटा, ता. मावळ) असे अटक केलेले तरुणाचे नाव आहे. अधिक माहितीनुसार, सोमवारी पुणे ग्रामीणचे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक वडगाव मावळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत खुनाच्या गुन्ह्याचा समांतर तपास करीत होते. त्यावेळी सहायक पोलीस उपनिरीक्षक प्रकाश वाघमारे यांना वडगाव मावळ येथील एका व्यक्तीकडे पिस्तूल असल्याची माहिती मिळाली.

त्यानुसार वडगाव बाजार पेठेतील रोडवर स्वप्नील मुऱ्हे यास पथकाने सापळा रचून ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता विनापरवाना व बेकायदेशीर हेतूने कमरेला बाळगलेले गावठी पिस्टल व दोन जिवंत काडतुसे आढळून आले. तसेच दुचाकीसह एकूण ४० हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपीस पुढील कारवाईसाठी वडगाव मावळ पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.

टॅग्स :PuneपुणेVadgaon Mavalवडगाव मावळ