पुणे - जिल्ह्यातील रांजणगाव खंडाळे परिसरात घडलेली एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. एका आईसह दोन निष्पाप बालकांना पेट्रोल ओतून जिवंत जाळल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. या अमानुष तिहेरी हत्याकांडामुळे संपूर्ण पुणे हादरून गेला असून, परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आज रोजी खंडाळा माथ्याजवळ रांजणगाव गावचे हद्दीत एक महिला व तिचे दोन लहान मुलांना कोणीतरी अज्ञात इसमाने त्यांचा खून करून त्यांना पेटवून दिलेले आहे. सदर महिलेचे वय अंदाजे 25 ते 30 वर्ष असून लहान मुलाचे वय अंदाजे चार वर्षे लहान बाळाचे वय अंदाजे दीड वर्षे असे आहे. पुणे - अहिल्यानगर महामार्गालगत असलेल्या रांजणगाव खंडाळे परिसरात ही घटना घडली.
ग्रोवेल कंपनीच्या मागील बाजूस असलेल्या जागेत तीन जळालेल्या मृतदेह आढळले. सकाळी कामावर येणाऱ्या कंपनीच्या कामगारांना मृतदेह दिसताच त्यांनी तात्काळ पोलिसांना खबर दिली. रांजणगाव पोलिसांनी त्वरित घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतले असून, शवविच्छेदनासाठी ते रुग्णालयात पाठवले आहेत.प्राथमिक तपासानुसार, मृतांमध्ये एक महिला आणि दोन लहान मुले (एक मुलगा व एक मुलगी) यांचा समावेश आहे. या तिघांना अन्यत्रून येथे आणण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यांच्यावर पेट्रोल ओतून त्यांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, पावसामुळे आग पूर्णपणे न लागल्याने मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत सापडले.ओळख अद्यापही अज्ञातया तिघांची ओळख अद्याप पटलेली नाही. त्यामुळे पोलिसांनी परिसरातील हरवलेल्या व्यक्तींबाबतची माहिती गोळा करण्यास सुरुवात केली आहे. तसेच, घटनास्थळी मिळालेले पुरावे, सीसीटीव्ही फुटेज व इतर तांत्रिक तपशील तपासण्यात येत आहेत. स्थानिक गुन्हे शाखेची मदत घेऊन पोलिस या खूनामागील नेमकी कारणमीमांसा करण्याचा प्रयत्न करत आहेत.पोलीस तपास सुरु, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरणही घटना अत्यंत अमानुष आणि संतापजनक असून, नागरिकांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला असून, लवकरच आरोपींना अटक होईल असा विश्वास पोलीस प्रशासनाने व्यक्त केला आहे.