पिंपरी : जमीन विक्रीच्या वादातून कुटुंबाचे अपहरण करून त्यांना बेदम मारहाण करण्यात आली. संशयितांनी फिर्यादीच्या वडिलांकडून २० लाख रुपयांचा धनादेश आणि रोकड जबरदस्तीने काढून घेत जीवे मारण्याची धमकी दिली. तळेगाव दाभाडे येथे ही घटना घडली.नंदकुमार दत्तात्रय गाडे (रा. सुदुंबरे, मावळ) यांनी तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. बाळकृष्ण खंडू गाडे (५२) असे अटक केलेल्याचे नाव आहे. विठ्ठल खंडू गाडे (४७), ओंकार गाडे (२४), सार्थक गाडे (२०) आणि इतर ७ ते ८ अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.फिर्यादी आणि त्यांचे कुटुंबीय दुय्यम निबंधक कार्यालयासमोर असताना संशयितांनी त्यांना जमीन विक्रीवरून धमकी दिली. त्यानंतर फिर्यादी आणि त्यांच्या वडिलांना जबरदस्तीने गाडीत बसवून कातवी रोडवर नेले. तिथे त्यांना पट्ट्याने मारहाण करून जखमी केले व ‘तुमचा मुळशी पॅटर्न करतो’, अशी धमकी दिली. तसेच, वडिलांकडून २० लाख रुपयांचा धनादेश आणि रोकड जबरदस्तीने घेतली.
Web Summary : Family kidnapped over land sale dispute near Pune, assaulted. Perpetrators extorted money, threatened 'Mulshi Pattern'-style violence. Police arrested one, several others booked.
Web Summary : पुणे के पास जमीन बिक्री विवाद में परिवार का अपहरण, मारपीट। अपराधियों ने पैसे वसूले, 'मुळशी पैटर्न' जैसी हिंसा की धमकी। पुलिस ने एक को गिरफ्तार किया, कई अन्य पर मामला दर्ज।