शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
4
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
5
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
6
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
7
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
8
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
9
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
10
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
11
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
12
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
13
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
14
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
15
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
16
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
17
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
18
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
19
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
20
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
Daily Top 2Weekly Top 5

Pune Software Engineer Suicide Case: मित्रांनीच संगणक अभियंत्याची गोळी झाडून केली हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2021 12:30 IST

कोंढव्यातील संगणक अभियंत्याने आत्महत्या केली असावी, असा पोलिसांना संशय येत होता

ठळक मुद्देमित्रांनी संगनमत करुन कोणत्या अभियंत्याच्या डोक्यात गोळी झाडून केला खून

पुणे : कोंढव्यातील संगणक अभियंत्याची पत्नी भांडणामुळे गेल्या वर्षभरापासून मुलासह वेगळी राहते. तसेच त्याने आत्महत्या करण्याची दिलेली धमकी व मित्रांनी सांगितलेली हकीकत यामुळे या संगणक अभियंत्याने आत्महत्या केली असावी, असा पोलिसांना संशय येत होता. मात्र या मित्रांकडे सखोल चौकशी केल्यावर आता त्याला कलाटणी मिळाली असून कोंढवा पोलिसांनी या अभियंत्याच्या दोघा मित्रांना अटक केली आहे. खूनासाठी वापरण्यात आलेले पिस्तुल पोलिसांनी विहिरीतून शोधून काढले आहे.

 सागर दिलीप बिनावत (वय ३३, रा. श्रद्धानगर, कोंढवा) आणि दत्तात्रय देवीदास हजारे (रा. कोंढवा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. गणेश तारळेकर (वय ४७, रा. सन फ्लॉवर सोसायटी, कोंढवा) असे खून झालेल्या अभियंत्याचे नाव आहे. याप्रकरणी त्यांची पत्नी स्फुर्ती गणेश तारळेकर (वय ४२, रा. पिसोळी) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना ११ ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्यापूर्वी घडली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  गणेश तारळेकर हे विवाहित असून त्यांना एक १४ वर्षाचा मुलगा आहे. कौटुंबिक भांडणामुळे त्यांची पत्नी मुलासह एक वर्षापासून जवळच असलेल्या आपल्या वडिलांकडे राहत आहेत. गेल्या रविवारी दुपारी गणेश तारळेकर हे आपल्या दोन मित्रांसह घरात पार्टी करीत होते. त्यावेळी गणेश यांनी पिस्तुल काढून आत्महत्या करणार असल्याचे म्हणाले. या दोघा मित्रांनी त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला. तरीही त्यांनी गोळी झाडून घेतली. गोळी त्यांच्या हनुवटीला लागून ते रक्ताच्या थोरोळ्यात पडले. या प्रकाराने दोघे मित्र घाबरुन गेले. ते तारळेकर यांना तसेच घरात टाकून पळून गेले. 

सोमवारी दुपारी त्यांनी ही बाब पोलिसांना कळविली. कोंढवा पोलिसांनी घरात जाऊन पाहिले असता तारळेकर हे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आढळून आले.  या घटनेच्या दोन दिवस अगोदर गणेश तारळेकर यांनी त्यांच्या सासऱ्यांनी फोन करुन आपण आत्महत्या करणार असल्याची धमकी दिली होती. तशी तक्रार त्यांनी कोंढवा पोलिसांकडे केली होती.या दोघा मित्रांनी सांगितलेली हकीकत आणि या घटनेच्या दोन दिवस अगोदरची घटना यावरुन त्यांनी खरोखरच आत्महत्या केली असावी असा संशय पोलिसांना येत होता.

पोलिसांच्या तपासात वेगळी माहिती पुढे आली

मात्र, याबाबत केलेल्या तपासात वेगळी माहिती पुढे आली. दारु पार्टी करीत असताना या दोघा मित्रांनी संगनमत करुन कोणत्यातरी कारणावरुन तारळेकर यांच्या डोक्यात पिस्तुलाने गोळी झाडून त्यांचा खून केला व त्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने पिस्तुल विहिरीत फेकून दिल्याचे उघड झाले. पोलिसांनी विहीरीत टाकलेले हे पिस्तुल शोधून काढले असून तारळेकर यांच्या पत्नीच्या फियार्दीवरुन पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. जर त्यांनी आत्महत्या केली तर ते दोघेही एकत्र का पळून गेले. या दोघांनी कोणत्या कारणावरुन त्यांचा खून केला. याचा पोलीस निरीक्षक जानकर अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटक