शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

बुधवार पेठेत हातवारे करून ग्राहकांना बोलवणे दोन तरुणींना पडले महागात; गुन्हा दाखल; फरासखाना पोलिसांची कारवाई

By किरण शिंदे | Updated: December 14, 2025 17:04 IST

मागील काही महिन्यांपासून त्या बुधवार पेठ परिसरात वेश्याव्यवसाय करत असल्याचेही तपासात समोर आले आहे.

पुणे -  बुधवार पेठेतील सार्वजनिक रस्त्यावर उघडपणे हातवारे करून ग्राहकांना बोलावणं दोन तरुणींना चांगलचं महागात पडलं आहे. फरासखाना पोलिसांनी या २ तरुणींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अनैतिक मानवी व्यापारास प्रतिबंध अधिनियमांतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. संबंधित महिलांना पोलिसांकडून नोटीस देण्यात आली आहे.फरासखाना पोलीस ठाण्यातील महिला पोलिस हवालदाराने दिलेल्या तक्रारीनुसार, बुधवार पेठेतील श्रीनाथ टॉकीजसमोरील सार्वजनिक रस्त्यावर या दोन महिला उभ्या राहून हातवारे करत ग्राहकांना आकर्षित करत होत्या. रस्त्याने ये-जा करणाऱ्या नागरिकांसमोर जाणूनबुजून अंगविक्षेप आणि अश्लील हावभाव करत अडथळा निर्माण करत होत्या. त्यामुळे ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणातील दोन्ही तरुणींचे वय अनुक्रमे ३१ आणि ३२ वर्षे असून त्या मूळच्या पश्चिम बंगालच्या आहेत. मागील काही महिन्यांपासून त्या बुधवार पेठ परिसरात वेश्याव्यवसाय करत असल्याचेही तपासात समोर आले आहे.दरम्यान, सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारे अश्लील हावभाव करून नागरिकांना त्रास होऊ नये, तसेच कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी ही कारवाई करण्यात आल्याचे फरासखाना पोलिसांकडून सांगण्यात आले. संबंधित तरुणींना सध्या नोटीस देण्यात आली असून पुढील कायदेशीर कारवाई तपासानंतर करण्यात येणार आहे. बुधवार पेठ परिसरात सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या अशा प्रकारांवर यापुढेही कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिस प्रशासनाने दिला आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Pune: Two women arrested for soliciting customers in Budhwar Peth.

Web Summary : Pune police arrested two West Bengal women in Budhwar Peth for soliciting customers with indecent gestures. They were charged under anti-trafficking laws for creating public nuisance. Further investigation is underway. Police warn of strict action against public indecency.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रPuneपुणेCrime Newsगुन्हेगारी