शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

Pune Crime: मामाला चापटा मारून गुंड भाच्याने केली जबरी लूट अन् रिक्षाही पळवली

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2023 10:09 IST

मारहाण करून जबरदस्तीने खिशातील पैसे काढून घेतले...

पुणे : गुंड भाच्याने रिक्षाचालक असलेल्या मामाला बोलावून घेतले. त्याने पैसे देण्यास नकार दिल्यावर त्याला मारहाण करून जबरदस्तीने खिशातील पैसे काढून घेतले. त्यानंतर त्यांची रिक्षा जबरदस्तीने चोरून नेली.

याबाबत सचिन मदन बनसोडे (वय ४४, रा. भोपळे चौक, कॅम्प) यांनी लष्कर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी भाचा आकाश गोरख कांबळे (रा. भोपळे चौक, कॅम्प) याला अटक केली आहे. त्याचा साथीदार अविनाश ऊर्फ बंड्या याच्यावर गुन्हा दाखल केला असून दोघेही सराईत गुन्हेगार आहेत. हा प्रकार गोळीबार मैदानाजवळील कॅन्टोंमेंट हॉस्पिटलजवळ सोमवारी सकाळी पावणेबारा वाजता घडला.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सचिन बनसोडे हे रिक्षाचालक असून आकाश कांबळे हा त्यांचा भाचा आहे. कांबळे यांनी फिर्यादी यांना फोन करून बोलावून घेतले. त्याप्रमाणे बनसोडे रिक्षा घेऊन तेथे गेले असताना कांबळे याने त्यांच्याकडे एक हजार रुपये मागितले. त्यांनी पैसे देण्यास नकार दिल्यावर कांबळे याने त्यांना रिक्षातून बाहेर ओढून हाताने चापट्या मारल्या. त्यांच्या खिशातील १ हजार ५० रुपये जबरदस्तीने काढून घेऊन त्यांना धक्काबुक्की केली. अविनाश याने त्यांच्याकडील रिक्षाची चावी हिसकावून घेतले. दोघे ही रिक्षा घेऊन पळून गेले. पोलिसांनी आकाश कांबळे याला अटक केली असून सहायक पोलिस निरीक्षक गायकवाड तपास करीत आहेत.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड