पुणे : खासगी कंपनीतील महिला कर्मचाऱ्याचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसह चार जणांविरोधात शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत एका महिलेने शिवाजीनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार, आनंद राठी वेल्थ कंपनीचा मुख्य कार्यकारी अधिकारी राकेश रावल, कार्यकारी संचालक स्वप्न चक्रवर्ती, सह मुख्य कार्यकारी अधिकारी फिरोज अजीज, एचआर प्रमुख तेजल शहा आणि कार्यकारी संचालक सोनाली रावल यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३३ वर्षीय पीडित महिला शहरातील आनंद राठी वेल्थ या खासगी संस्थेत कामाला आहे. कंपनीतील कार्यकारी संचालकाने महिलेशी लगट करून तिचा विनयभंग केला. महिलेचा पाठलाग करून तिचा छळ केला. याबाबतची तक्रार कोणाला केल्यास कंपनीतून काढून टाकेल, अशी धमकी दिली. त्यानंतर, पीडित महिलेने कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसह अन्य संचालकांकडे तक्रार दिली. त्यांनीही महिलेच्या या तक्रारीची दखल घेतली नाही. उलट सूडबुद्धीने पीडित महिलेची दुबईतील कार्यालयात बदली केली, असे महिलेने फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणातील आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नसून, पोलिस उपनिरीक्षक जाधव या पुढील तपास करत आहेत.अंतर्गत समितीमार्फत तक्रार नोंदविण्याचा दिला होता सल्लायाबाबत आनंद राठी वेल्थतर्फे एचआर तेजल शहा यांनी प्रतिक्रिया देताना, व्यवस्थापनाने सुरुवातीच्या टप्प्यातच संबंधित कर्मचाऱ्याला पीओएसएच फ्रेमवर्कनुसार अंतर्गत समितीमार्फत तक्रार नोंदविण्याचा सल्ला दिला होता. मात्र, त्यांनी हा मार्ग स्वीकारला नाही आणि त्याऐवजी मुंबई पोलिसांकडे धाव घेतली. आवश्यक चौकशीनंतर, मुंबई पोलिसांनी २४ मार्च रोजी हा विषय बंद केला.
संबंधित कर्मचाऱ्याने पुणे येथील स्थानिक समितीकडेही दाद मागितली, जिथे त्यांना पुन्हा संस्थेच्या अंतर्गत समितीकडे तक्रार करण्याचा सल्ला देण्यात आला. तरीही, त्यांनी अंतर्गत समितीमार्फत जाण्याची प्रक्रिया स्वीकारली नाही आणि नंतर औद्योगिक न्यायालयात धाव घेतली, जिथे हा विषय सध्या न्यायप्रविष्ट असल्याचे सांगितले.
Web Summary : Pune police filed a case against executives of Anand Rathi Wealth for allegedly sexually harassing a female employee. The victim reported the harassment and threats after she complained and was transferred to Dubai. The company claims she didn't follow internal complaint procedures.
Web Summary : पुणे पुलिस ने आनंद राठी वेल्थ के अधिकारियों के खिलाफ एक महिला कर्मचारी का यौन उत्पीड़न करने का मामला दर्ज किया। पीड़िता ने शिकायत और दुबई स्थानांतरित होने के बाद उत्पीड़न और धमकियों की सूचना दी। कंपनी का दावा है कि उसने आंतरिक शिकायत प्रक्रियाओं का पालन नहीं किया।