शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

परीक्षा सुरळीत पार पडण्यासाठी ४० हजारांची लाच;अनंतराव पवार शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे उपप्रचार्य लाचलुचपतच्या जाळ्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2025 20:00 IST

तक्रारदारांच्या इन्स्टिट्यूटतर्फे चालू वर्षाच्या परीक्षेसाठी ४५ विद्यार्थी बसले आहेत. या परीक्षेसाठी शासकीय औद्योगिक शिक्षण संस्थेकडून परीक्षा पर्यवेक्षक नेमले जातात. त्यानुसार तक्रारदारांनी पर्यवेक्षक नेमणुकीसाठी अनंतराव पवार शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेस पत्र दिले होते.

पुणे : एका खाजगी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूटमधील वार्षिक परीक्षेसाठी पर्यवेक्षक नेमण्यासाठी आणि परीक्षा विना अडथळा सुरळीत पार पडण्यासाठी इन्स्टिट्यूटच्या अध्यक्षांकडून ४० हजारांची लाच घेताना माळेगाव येथील अनंतराव पवार शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे उपप्रचार्य लाचलुटपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात आडकले आहेत. त्यांच्यावर बारामती पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अवधूत भिमाजी जाधवर, वय ५३, लाच घेताना लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात अडकलेल्या उपप्राचार्याचे नाव आहे. जाधवर हे माळेगाव येथील अनंतराव पवार शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थे उपप्राचार्य आहेत, त्यांच्याकडे सध्या प्राचार्य पदाचा अतिरिक्त कार्यभार आहे. तक्रारदार हे एका खासगी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष आहेत.तक्रारदारांच्या इन्स्टिट्यूटतर्फे चालू वर्षाच्या परीक्षेसाठी ४५ विद्यार्थी बसले आहेत. या परीक्षेसाठी शासकीय औद्योगिक शिक्षण संस्थेकडून परीक्षा पर्यवेक्षक नेमले जातात. त्यानुसार तक्रारदारांनी पर्यवेक्षक नेमणुकीसाठी अनंतराव पवार शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेस पत्र दिले होते. जाधवर यांनी तक्रारदाराकडे परीक्षेसाठी पर्यवेक्षक नेमण्यासाठी आणि ती परीक्षा सुरळीत पार पाडून देण्यासाठी परीक्षेस बसलेल्या एका विद्यार्थ्यासाठी २००० असे ४५ विद्यार्थ्यांसाठी एकूण ९० हजार रुपये लाचेची मागणी केली. त्यानंतर १० हजार रुपये घेऊन पर्यवेक्षक नेमण्याचे पत्र दिले. त्यानंतर पर्यवेक्षक येऊन परीक्षा सुरू झाली. परीक्षा सुरू असताना जाधवर यांनी उर्वरित ८० हजार रुपये देण्यासाठी तक्रारदाराच्या पाठीमागे तगादा लावला. तडजोडीअंती ४० हजार रुपये ठरले.त्यानंतर तक्रारदारांनी याबाबत लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर लाच लुचपत विभागाने मंगळवारी बारामती येथील हॉटेल सिटी इन येथे सापळा लावला. यावेळी तक्रारदाराकडून ४० हजारांची लाच घेताना लाच लुटपत विभागाने अवधूत जाधवर यांना रंगेहाथ पकडले. जाधवर यांच्यावर बारामती पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, ही कारवाई लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पुणे परिक्षेत्राचे पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे व अपर पोलिस अधीक्षक डॉ. शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने करण्यात आली.

टॅग्स :PuneपुणेBribe Caseलाच प्रकरणpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्र