पुणे : शाळकरी मुलीशी अश्लील कृत्य करून पसार झालेल्या रिक्षाचालकाला हडपसर पोलिसांनी अटक केली. त्याच्याविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी २४ तासांत न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. युनूस गफार खान (वय ५५, रा. कोंढवा) असे अटक करण्यात आलेल्या रिक्षाचालकाचे नाव आहे.
याबाबत एका शाळकरी मुलीने दिलेल्या फिर्यादीनुसार, खान याच्याविरुद्ध बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियमान्वये (पोक्सो) गुन्हा दाखल करण्यात आला. ६ मार्च रोजी पीडित ११ वर्षीय शाळकरी मुलगी शाळेतून घरी निघाली होती. त्यावेळी रिक्षाचालक खान याने
मुलीशी अश्लील कृत्य केले. घाबरलेल्या मुलीने याबाबत पोलिसांकडे तक्रार दिली. गुन्हा दाखल झाल्यानंतर खान पसार झाला होता. पोलिसांनी त्याचा शोध घेतला. खान याला न्यायालयात हजर करण्यात आले.
या गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलिसांनी तपास करून आवश्यक ते पुरावे संकलित करून त्याच्याविरोधात न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी २४ तासांत आरोपपत्र दाखल केले.परिमंडळ ६ चे पोलिस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे, सहायक आयुक्त अतुलकुमार नवगिरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय मोगले, नीलेश जगदाळे, सहायक पोलिस निरीक्षक विनोद साने, दत्तात्रय खेडेकर, कानेकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.
Web Summary : Pune police arrested a rickshaw driver, Yunus Khan, for a lewd act against an 11-year-old schoolgirl. He was charged under the POCSO Act. The police filed a chargesheet within 24 hours of the arrest. The arrest was made following the girl's complaint.
Web Summary : पुणे पुलिस ने 11 वर्षीय स्कूली छात्रा के साथ अश्लील हरकत करने के आरोप में यूनुस खान नामक एक रिक्शा चालक को गिरफ्तार किया। उस पर पोक्सो एक्ट के तहत आरोप लगाए गए हैं। पुलिस ने गिरफ्तारी के 24 घंटे के भीतर आरोप पत्र दाखिल कर दिया। गिरफ्तारी लड़की की शिकायत के बाद की गई।