शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

उच्चशिक्षित, सज्ञान मुलीची पोटगी न्यायालयाकडून बंद;सेवानिवृत्त पोलिस कर्मचाऱ्याला न्यायालयाचा दिलासा

By नम्रता फडणीस | Updated: May 6, 2025 20:50 IST

- पत्नीशी विभक्त झाल्यानंतर न्यायालयाने २००२ साली रोझ हिला दरमहा ५०० रुपये पोटगी देण्याचा आदेश दिला.

पुणे : पत्नीशी विभक्त झाल्यानंतर मुलीला पोटगी देण्याचा आदेश न्यायालयाने २००२ साली पित्याला दिला होता. मागील २३ वर्षांपासून सेवानिवृत्त पोलिस पिता मुलीला पोटगी देत होता. मुलगी उच्चशिक्षित, तसेच सज्ञान झाल्याने पोटगी बंद होण्यासाठी वडिलांनी केलेला अर्ज न्यायालयाने मंजूर करीत पित्याला दिलासा दिला. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. जी. बरडे यांनी हा आदेश दिला.

महंमद आणि रोझ (दोघांची नावे बदललेली आहे.) हे बाप-लेक आहेत. पत्नीशी विभक्त झाल्यानंतर न्यायालयाने २००२ साली रोझ हिला दरमहा ५०० रुपये पोटगी देण्याचा आदेश दिला. २०१४ पर्यंत पोटगीची रक्कम ५ हजार रुपयांपर्यंत करण्यात आली. यादरम्यान, महंमद हे सेवानिवृत्त झाले. वृद्धापकाळाने त्यांना विविध आजारही जडले. २०२५ पर्यंत महंमद यांच्याकडून मुलीला पोटगी देणे सुरू होते. बळावलेले आजारपण त्यात मुलीचे उच्च शिक्षण पूर्ण होत, ती सज्ञान झाल्याने पोटगी बंद होण्यासाठी महंमद यांनी ॲड. एम. बी. सय्यद व ॲड. मारुफ मुश्ताक पटेल यांमार्फत न्यायालयात अर्ज केला.

न्यायालयात युक्तिवादादरम्यान ॲड. सय्यद व ॲड. पटेल म्हणाले की, मुलीचे वय आता २५ वर्षे असून, ती सज्ञान आहे. रोझ ही मीडिया ग्राफिक्स ॲनिमेशनची पदवी परीक्षा उत्तीर्ण झाली असून, पुढील शिक्षणासाठी परदेशात जात आहे. ती काम करण्यास सक्षम असून, तिचे वडील सेवानिवृत्त असून, पेन्शनवर जगत आहेत. त्यांना अनेक आजार झाले आहेत. रोझनेही आपण कमावू शकतो. तसेच, वडिलांबरोबर कोणतेही संबंध ठेवले नसल्याचे सांगितले. न्यायालयाने दोन्ही पक्षांची बाजू ऐकून घेत अहमद यांनी केलेला पोटगी बंदचा अर्ज मंजूर केला.

जोपर्यंत अल्पवयीन अपत्य प्रौढ होत नाही, तोपर्यंत त्याला आपल्या वडिलांकडून देखभाल मिळण्याचा अधिकार आहे. यास शारीरिक व मानसिक अपंगत्व आलेले अपत्य अपवाद आहे. सर्वोच्च न्यायालायनेही जर एखादी प्रौढ मुलगी तिच्या वडिलांशी कोणतेही संबंध ठेवू इच्छित नसेल, तर तिला वडिलांकडून शिक्षण व विवाहासाठी खर्च मागण्याचा हक्क नाही हे स्पष्ट केले आहे. त्याप्रकरणांच्या आधारे न्यायालयात युक्तिवाद करण्यात आला. न्यायालयाने तो ग्राह्य धरत पोटगी बंदचा अर्ज मंजूर केला. - ॲड. मारूफ पटेल, महंमद यांचे वकील 

 

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रCourtन्यायालयpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड