शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना पॉझिटिव्ह महिलेला उपचाराच्या प्रतीक्षेत 'जम्बो'बाहेर फूटपाथवर झोपण्याची वेळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2021 15:48 IST

पुण्यात कोरोना रुग्णांना उपचार मिळण्यात येताहेत अडचणी....

प्राची कुलकर्णी - 

पुणे : पुण्यात कोरोना रुग्णांची संख्या प्रचंड वेगाने वाढते आहे.त्यातच शहरातील खासगी व सरकारी रुग्णालयात कोरोना बाधितांना उपचार मिळण्यात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. एका कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण महिलेला उपचाराच्या प्रतीक्षा करताना फुटपाथवर झोपण्याची वेळ आली असल्याची धक्कादायक घटना घडली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील वास्तव्याला असणाऱ्या या महिलेची कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता.त्यानंतर तिने उपचारासाठी महापालिकेचे जम्बो रुग्णालय गाठले. तिथे आल्यावर या महिलेला श्वास घेण्यातखूप अडथळा येऊ लागला.तातडीने उपचाराची आवश्यकता असताना तिला व्हीलचेअर नाही म्हणून थांबण्यास सांगितले. मात्र त्रास असहाय्य झाल्यामुळे ती रस्त्यावरच्या फुटपाथवरच झोपली. परंतु, तिथून तिला उठवण्यात आले. काहीवेळ असाच काढल्यानंतर जम्बो रुग्णालय प्रशासनाने थोड्यावेळापूर्वी या महिलेला व्हीलचेअर उपलब्ध करून देत उपचारासाठी आत नेले आहे.

महापालिकेच्या वतीने मोठा गाजावाजा करत निर्मिती करण्यात आलेल्या जम्बो हॉस्पिटलसमोर रुग्णांना उपचार मिळण्यासाठी रोज अशी प्रतीक्षा करत ताटकळत उभे राहावे लागत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

पुणे शहरात कोरोनाबाधितांना ताबडतोब उपचार उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासन यंत्रणा युद्धपातळीवर कार्यरत आहे.मात्र, तरीदेखील रुग्णांना उपचार मिळविताना मोठी हेळसांड होत असून काही कोरोना बाधितांचा वेळेत उपचार न मिळाल्यामुळे जीव देखील गमवावा लागला आहे.

..........

पुणे महापालिकेच्या हेल्पलाईन क्रमांकावर  संपर्क करून तिथून कोरोनाबाधित रुग्णांनी जम्बो हॉस्पिटलमध्ये येणे अपेक्षित आहे. मात्र तसे न होता रुग्ण उपचारासाठी  थेट जम्बोकडे येत आहे.  त्यामुळे हा सर्व गोंधक उडतो आहे.  दोन तीन दिवसांच्या कालावधीत असे प्रकार घडत आहे. मात्र, हेल्पलाईन क्रमांकाद्वारे ज्यावेळी रुग्ण येथे दाखल होतात त्यावेळी आम्ही त्यांची पूर्ण व्यवस्था केली जाते.त्यामुळे रुग्ण किंवा त्यांच्या नातेवाईकांनी हेल्पलाईन क्रमांकाचा आधार घेऊन जम्बोत यावे.

-  डॉ. श्रीयांश कपाले, डीन , जम्बो हॉस्पिटल.

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाhospitalहॉस्पिटलcorona virusकोरोना वायरस बातम्याMayorमहापौरcommissionerआयुक्त