शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीरमध्ये हिंदूंचे टार्गेट किलिंग; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
2
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
3
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
4
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
5
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य
6
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
7
तुम्हाला वारंवार तहान लागते, पाणी प्यायल्यावरही घसा कोरडा होतो? 'या' गंभीर आजारांचे संकेत
8
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
9
बँकेने गुन्हा दाखल केल्याने त्याची सटकली, साथीदारांना सोबत घेत अख्खी बँकच पेटवली
10
UPSC पास झाल्यानंतर उमेदवारांना पहिला पगार कधी आणि किती मिळतो? पाहा...
11
"मुस्लीम राजेशाही असो अथवा लोकशाही, वक्फ सर्वत्र...;" सौदीत पोहोचलेल्या PM मोदींवर ओवेसींचा निशाणा
12
Jammu and Kashmir : दहशतवाद्यांनी पर्यटकांना आधी विचारला 'हा' प्रश्न अन् सुरू केला गोळीबार, नेमकं काय घडलं?
13
दहशतवाद्यांनी आधी धर्म विचारला, नंतर झाडल्या गोळ्या, पहलगाम हल्ल्यातील जखमींचा धक्कादायक दावा   
14
'नरेंद्र मोदी जगातील सर्वात लोकप्रिय नेते', जेडी व्हेन्स यांनी केले पंतप्रधानांचे कौतुक...
15
IPL 2025: हर्षा भोगलेंना KKRच्या मॅचमधून मुद्दाम वगळलं? खुद्द त्यांनीच दिलं स्पष्टीकरण
16
तेव्हा सलग १७ वर्षे घटत होते सोन्याचे दर, झालं होतं एवढं स्वस्त, मात्र आता...  
17
जालना: बॉयफ्रेंडकडून बदनामीच्या धमक्या, १८ वर्षीय तरुणीने संपवलं आयुष्य, मृतदेह कुठे सापडला?
18
टेबल फॅन खूपच खराब झालाय? स्वच्छ करण्यासाठी पाहा 'ही' सोपी पद्धत, पंखा दिसेल नव्यासारखा
19
नरेंद्र मोदींचं विमान सौदी अरेबियाच्या हवाई हद्दीत प्रवेश करताच घडलं असं काही, सारेच अवाक्
20
सलग सहाव्या दिवशी बाजार तेजीत बंद; 'या' बँकांच्या शेअर्सने खाल्ला भाव; कोणत्या सेक्टरमध्ये घसरण?

Pune Corona News: शहरात कोरोनाचा उद्रेक; रविवारी तब्बल '४ हजारहुन अधिक कोरोनाबाधित'

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2022 19:00 IST

कोरोनाबाधित रुग्णांची संख्या जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात झपाट्याने वाढत आहे

पुणे : शहरात रविवारी रुग्णसंख्येचा उद्रेक पहायला मिळाला. रविवारी शहरात १८ हजार ०१२ चाचण्या झाल्या. त्यापैकी ४०२९ कोरोनाबाधित रुग्णांचे निदान झाले. शहराचा पॉझिटिव्हीटी रेट २२ टक्क्यांवर पोहोचला आहे. सक्रिय रुग्णसंख्या १४ हजार ८९० इतकी झाली आहे. 

महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या अहवालानुसार, रविवारी ६८८ रुग्णांना घरी सोडण्यात आले. सध्या १३४ रुग्ण ऑक्सिजनसह उपचार घेत आहेत. तर, ३९ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. शहरात ५.४८ टक्के रुग्ण हॉस्पिटलमध्ये, ९४.५२ टक्के रुग्ण गृह विलगीकरणात आहेत. शहरात ३९८३ ऑक्सिजन बेड, तर ५२६ व्हेंटिलेटर बेड उपलब्ध आहेत. रविवारी एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला.

कोरोनाबाधित रुग्णांची संख्या जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात झपाट्याने वाढत आहे. एका दिवसात तबबल १५०० रुग्णांची वाढ झाली. रुग्णसंख्या कितीतरी पटींनी वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. त्याचवेळी बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण ९५.४३ टक्के आहे. नागरिकांनी मास्कचा वापर, सोशल डिस्टनसिंग आणि सॅनिटायरझरचा वापर करावा, असे आवाहन केले जात आहे.

तिसऱ्या आठवड्यापर्यंत रुग्णसंख्येचा उच्चांक गाठण्याची शक्यता  शहरात ८ महिन्यांनी रुग्णसंख्येने ४००० चा टप्पा ओलांडला आहे. यापूर्वी २ मे रोजी शहरात ४०४४ इतक्या कोरोनाबाधित रुग्णांचे निदान झाले होते. त्यावेळी १६ हजार ६१० कोरोना चाचण्या झाल्या होत्या. सक्रिय रुग्णसंख्या ४२ हजार २२९ इतकी होती. जानेवारी महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत तिसऱ्या लाटेतील रुग्णसंख्येचा उच्चांक गाठला जाईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. शहराचा पॉझिटिव्हीटी रेट २८ ते ३० टक्क्यांवर पोहोचेल आणि त्यानंतर साथ ओसरू लागेल, असे सांगण्यात येत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसOmicron Variantओमायक्रॉनdocterडॉक्टरPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका