शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

पुणे : व्यावसायिक आत्महत्या प्रकरण; दोघा भागीदारांसह चौघांवर गुन्हा  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2018 06:37 IST

भागीदारांनी केलेल्या घोटाळ्यामुळे आता गुंतवणूकदारांचे पैसे कसे द्यायचे, या विचाराने मानसिक दबावातून व्यावसायिकाने गोळी झाडून घेऊन शुक्रवारी आत्महत्या केली होती़ याप्रकरणी हडपसर पोलिसांनी दोघा भागीदारांसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे़

पुणे : भागीदारांनी केलेल्या घोटाळ्यामुळे आता गुंतवणूकदारांचे पैसे कसे द्यायचे, या विचाराने मानसिक दबावातून व्यावसायिकाने गोळी झाडून घेऊन शुक्रवारी आत्महत्या केली होती़ याप्रकरणी हडपसर पोलिसांनी दोघा भागीदारांसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे़अरविंद लक्ष्मण फाळके (वय ५७, रा़ अमर कॉटेज, भोसलेनगर, हडपसर) असे आत्महत्या केलेल्या व्यावसायिकाचे नाव आहे़ तर शिवाजी जाधव आणि सुनील गोसावी अशी गुन्हा दाखल झालेल्या त्यांच्या भागीदारांची नावे आहेत़आॅगस्ट २०१६ पासून हा प्रकार सुरु होता़ सध्या बँकांची फसवणूक केल्याच्या घोटाळ्यांची सर्वत्र चर्चा आहे़आता त्यामुळे या गुंतवणूकदारांचे पैसे कोठून द्यायचे, याबाबत अरविंद फाळके यांच्यावर प्रचंड मानसिक दबाव निर्माण झाला़ तसेच त्या चौघांनी त्यांना मानसिक त्रास देण्यास सुरुवात केली होती़ यामुळे अरविंद फाळके हे प्रचंड मानसिक दबावात होते़ शुक्रवारी ते सौदामिनी फायनान्सच्या कार्यालयात आले़ त्यांनी घरून आणलेला डबा खाल्ला़ त्यानंतर, ‘मी झोपतो’ असे सांगून ते आपल्या केबिनमध्ये गेले़काही वेळाने साडेतीनच्या सुमारास गोळी झाल्याचा आवाज आला़ तो आवाज ऐकून कार्यालयातील लोक त्यांच्या केबिनमध्ये गेले़तेव्हा फाळके हे रक्ताच्या थारोळ्यात पडले होते़ त्यांनी आपल्याकडील रिव्हॉल्व्हरमधून छातीत गोळी झाडून घेतली होती़ तातडीने त्यांना जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले़ परंतु, डॉक्टर तपासणीपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता़शिवाजी जाधव व सुनील गोसावी हे त्या वेळी एका लग्नासाठी कर्नाटकला गेले होते़ त्यांना ही बाब समजल्यावर ते फरार झाले आहेत़ अक्षय फाळके यांच्या फिर्यादीवरून हडपसर पोलिसांनी चौघांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे़ पोलीस उपनिरीक्षक विजय झंजाड अधिक तपास करीत आहेत़६ ते ८ कोटी रुपयांचा घोटाळा?याप्रकरणी अक्षय अरविंद फाळके (वय २८, रा़ भोसलेनगर, हडपसर) यांनी फिर्याद दिली आहे़ याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अरविंद फाळके यांनी शिवाजी जाधव व सुनील गोसावी यांच्याबरोबर २०११ मध्ये सौदामिनी फायनान्स ही कंपनी हडपसर येथील वैशाली हाईट्समध्ये सुरू केली़ त्याबरोबर या दोघांच्या सांगण्यावरून त्यांनी चीट फंडही सुरू केला़ चीट फंड व फायनान्स कंपनीसाठी त्यांनी नातेवाईक व इतरांकडून ठेवी घेतल्या होत्या़ त्यात जाधव, गोसावी व अन्य दोघांनी ६ ते ८ कोटी रुपयांचा घोटाळा करून ते पैसे दोघांनी स्वत:साठी वापरले़

टॅग्स :Crimeगुन्हाPuneपुणेSuicideआत्महत्या