शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

पुणे शहराचा पाणीपुरवठा बंद करणार; '३२ गाव कृती समिती'चा महापालिका प्रशासनाला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2025 20:44 IST

Pune News: कृती समितीचे राहुल पोकळे आणि रमेश बापू कोंडे यांनी शासनाने त्वरित कारवाई करावी, अन्यथा पुणेकरांना येत्या काळात पाणी टंचाईचा सामना करावा लागेल, असा इशारा दिला. 

-सलीम शेख, शिवणे पुणे महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या ३२ गावांमध्ये टॅक्स विषय अत्यंत गंभीर बनला आहे. आता ३२ गावं कृती समितीने पुणे महापालिका प्रशासनाला पाणीपुरवठा बंद करण्याचा इशारा दिला आहे.  तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या आदेशावर महापालिकेकडून कोणतीही कार्यवाही करण्यात न आल्याने समितीने आक्रमक भूमिका घेतली आहे.  

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

३२ गाव कृती समितीने यापूर्वी 'गाव विकणे आहे' अशा घोषणांपासून विविध आंदोलनं करण्यात केली आहेत. 

प्रकरण काय, कृती समिती आक्रमक का झालीये?

तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी १५ ऑक्टोबर २०२४ रोजी महापालिकेला आदेश दिला होता की, ग्रामपंचायतीच्या धरतीवर दुपटीने कर आकारून तात्काळ पुनर्विलोकन करावे. मात्र, पुणे महापालिकेकडून आजतागायत कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. या विलंबामुळे संतप्त झालेल्या ३२ गाव कृती समितीने मार्च अखेरपर्यंत आदेशाची अंमलबजावणी न केल्यास खडकवासला धरण क्षेत्रातील गावे पुणे शहराचा पाणीपुरवठा बंद करण्यासाठी आंदोलन छेडतील, असा इशारा दिला आहे.

या गावांना कोणताही निधी मिळालेला नाही, विकासकामे ठप्प आहेत, तरीही सक्तीने टॅक्स वसूल केला जात आहे. त्यामुळे या अन्यायकारक धोरणाविरोधात गावांमध्ये तीव्र नाराजी आहे. 

बैठकीत कृती समितीचे राहुल पोकळे आणि रमेश बापू कोंडे यांनी शासनाने त्वरित कारवाई करावी, अन्यथा पुणेकरांना येत्या काळात पाणी टंचाईचा सामना करावा लागेल, असा इशारा दिला. 

यावेळी कृती समितीचे राहुल पोकळे, रमेश बापू कोंडे,अरुण दांगट, सुभाष नाणेकर, नितीन दांगट, राहुल पायगुडे, संजय धावडे, अतुल दांगट नेताजी बाबर, मारुती किंडरे, महादेव धावडे, पोपटराव खेडेकर, अविनाश लगड, रमेश करंजावणे, अनिता इंगळे, विकास दांगट, शेखर मोरे, महेंद्र दांगट, बाळू दांगट, उमेश सरपाटील, सचिन दांगट, सुभाष शिंदे, रुपेश घुले, शेखर वाल्हेकर, अनिल वांजळे, सुरेंद्र कामठे, बाळासाहेब मोरे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

टॅग्स :Pune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाWaterपाणीagitationआंदोलनEknath Shindeएकनाथ शिंदे