शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
2
जम्मू-काश्मीरमध्ये हिंदूंचे टार्गेट किलिंग; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
3
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
4
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
5
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
6
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
7
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
8
बजाजच्या या शेअरनं दिला 22000% हून अधिकचा परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; आता...!
9
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
10
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
11
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य
12
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
13
तुम्हाला वारंवार तहान लागते, पाणी प्यायल्यावरही घसा कोरडा होतो? 'या' गंभीर आजारांचे संकेत
14
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
15
बँकेने गुन्हा दाखल केल्याने त्याची सटकली, साथीदारांना सोबत घेत अख्खी बँकच पेटवली
16
UPSC पास झाल्यानंतर उमेदवारांना पहिला पगार कधी आणि किती मिळतो? पाहा...
17
"मुस्लीम राजेशाही असो अथवा लोकशाही, वक्फ सर्वत्र...;" सौदीत पोहोचलेल्या PM मोदींवर ओवेसींचा निशाणा
18
Jammu and Kashmir : दहशतवाद्यांनी पर्यटकांना आधी विचारला 'हा' प्रश्न अन् सुरू केला गोळीबार, नेमकं काय घडलं?
19
दहशतवाद्यांनी आधी धर्म विचारला, नंतर झाडल्या गोळ्या, पहलगाम हल्ल्यातील जखमींचा धक्कादायक दावा   
20
'नरेंद्र मोदी जगातील सर्वात लोकप्रिय नेते', जेडी व्हेन्स यांनी केले पंतप्रधानांचे कौतुक...

Pune City Congress: पुणे शहर काँगेसच्या पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी; कोअर कमिटीच्या नावांवरून वाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2022 17:32 IST

महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शहरासाठी एक कोअर कमिटी स्थापन केली

पुणे : महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शहरासाठी एक कोअर कमिटी स्थापन केली. त्यातील नावांवरून इतकी आगपाखड झाली की दुपारी लगेचच त्यात काही नावांचा समावेश करून सुधारीत समिती जाहीर करण्यात आली. महापालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर या समितीने सत्ताधाऱ्यांचा भ्रष्टाचार व काँग्रेसने केलेली कामे जनआंदोलनाद्वारे मतदारांसमोर आणण्यासाठी काम करायचे आहे.

प्रदेशाध्यक्ष नाना पटोले पक्षाच्या डिजीटल सदस्य नोंदणीचा आढावा घेण्यासाठी नुकतेच शहरात आले होते. त्यावेळी त्यांनी या समितीबाबत चर्चा केली. त्यानंतर बुधवारी रात्री समितीची नावे निश्चित करण्यात आली. त्यात प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, माजी आमदार उल्हासपवार, माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, दीप्ती चवधरी, अरविंद शिंदे, आबा बागूल, संजय बालगुडे, विरेंद्र किराड, कमल व्यवहारे, पूजा आनंद, मुक्तार शेख यांचा समावेश होता. ही समिती गुरूवारी सकाळी जाहीर करण्यात आली.

त्यानंतर लगेचच नाराजांची ओरड सुरू झाली. अपेक्षित नावेच समितीत नाहीत, तेचतेच लोक किती दिवस पहायचे, यांनी तर पक्षाचे नुकसान केले, तेच का आता पुन्हा कोअर कमिटीत अशी एकच राळ उडाली. निष्ठावान पण मागील काही वर्षे शहरातील पक्षीय उपक्रमांपासून फारकत घेतलेल्यांनीही हे असेच सुरू राहणार म्हणून खासगीत टिका करण्यास सुरूवात केली. त्यानंतर लगेचच प्रदेशकडून काही नावांचा समावेश करून सुधारीत कोअर कमिटी पाठवण्यात आली. त्यात भोरचे आमदार संग्राम थोपटे यांचा मुख्य समन्वयक म्हणून समावेश आहे. त्यानंतर प्रदेशने नियुक्त केलेले पुणे शहराचे निरीक्षक संजय राठोड सहसमन्वयक आहेत. शहराध्यक्ष रमेश बागवे समितीचे अध्यक्ष आहेत, तर मोहन जोशी व व आधाची सर्व नावे सदस्य म्हणून आहेत. आता ही समिती महापालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर काम करणार आहे. सत्ताधारी भारतीय जनता पार्टीने मागील ५ वर्षे केलेला गैरकारभार चव्हाट्यावर आणणे व त्याचवेळी काँग्रेसने केलेली विकासाची कामे जनतेसमोर आणणे ही या समितीची कार्यकक्षा असल्याचे पक्षाने नमुद केले आहे.

टॅग्स :congressकाँग्रेसMuncipal Corporationनगर पालिकाElectionनिवडणूकBJPभाजपा