शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

पुणे शहर काँग्रेसकडून ‘फेकू दिन’ साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2018 03:53 IST

२०१४च्या लोकसभा निवडणूक प्रचारावेळी भाजपाने वर्षाला दोन कोटी युवकांना रोजगार देण्याच्या खोट्या आश्वासनाच्या निषेधार्थ कल्याणीनगर येथे पुणे शहर युवक काँग्रेसच्या वतीने १ एप्रिल हा दिन (जागतिक फेकू दिन) साजरा करण्यात आला.

चंदननगर  - २०१४च्या लोकसभा निवडणूक प्रचारावेळी भाजपाने वर्षाला दोन कोटी युवकांना रोजगार देण्याच्या खोट्या आश्वासनाच्या निषेधार्थ कल्याणीनगर येथे पुणे शहर युवक काँग्रेसच्या वतीने १ एप्रिल हा दिन (जागतिक फेकू दिन) साजरा करण्यात आला.भारतीय पकोडा उद्योग क्षेत्रात भव्य नोकरी महोत्सव हे उपाहासात्मक आंदोलन करण्यात आले. जनतेच्या खात्यातील पंधरा लाख गुल, एप्रिल फूल, बेरोजगार युवकांना देण्यात येणाऱ्या नोकºया गुल, एप्रिल फूल, नीरव मोदी, ललित मोदी, विजय मल्ल्या विदेशात गुल, एप्रिल फुल. अशा घोषणा या वेळी देण्यात आल्या.मोदी सरकार सत्तेत येण्याआधी अनेक भव्यदिव्य योजनांच्या घोषणा केल्या होत्या त्यापैकी एक महत्त्वपूर्ण घोषणा म्हणजे वर्षाला दोन कोटी रोजगार उपलब्ध करणार होते; पण वास्तव मात्र विरुद्ध असून, दोन लाखसुद्धा रोजगार निर्माण होऊ शकले नाहीत.या वेळी माजी शिक्षण मंडळ अध्यक्षा संगीता तिवारी, शहर युवक महासचिव राहुल शिरसाट, संतोष पाटोळे, वडगाव शेरी मतदारसंघाचे अध्यक्ष विशाल मलके, ब्लॉक अध्यक्षा मीरा शिंदे, बालाजी गाढे, विवेक भरगुडे, नरेश नलावडे , अमोल थोरात, अभिजित रोकडे, दादाक्षी कामठे, सचिन सुंडके, हर्ष तिवारी, अक्षय राजगुरू, निखिल मोझे, प्रसाद वाघमारे, अक्षय रतनगिरी, रुनेश कांबळे, आदी युवक पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन शहर युवकचे सचिव राहुल शिरसाट यांनी केले.पंधरा लाख रुपयांच्या चेकचे वाटपउलट अमित शहा हे सुशिक्षित तरुणांना पकोडा व्यवसाय चांगला उद्योग होऊ शकतो हा पर्याय देऊ पाहतात. लाखो रुपये खर्च करून पदवी घेतलेल्यांना हा सल्ला म्हणजे शिक्षणाचा अपमान आहे, असे विधान या वेळी शहराध्यक्ष विकास लांडगे यांनी केले.याआधी नागरिकांच्या खात्यात पंधरा लाख रुपये जमा करण्याच्या पोकळ आश्वासनाच्या विरोधात प्रतीकात्मक चेक वाटप करण्यात आले होते.

टॅग्स :Puneपुणेcongressकाँग्रेसApril fool 2018एप्रिल फूल 2018