शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

पुणेकरांनी ५८ दिवसात भरला ५८५ कोटींपेक्षा अधिक मिळकत कर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2021 22:07 IST

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतही पुणेकरांची प्रशासनाला साथ : विलास कानडे

पुणे : कोरोनाच्या पहिल्या लाटेत प्रशासनाला साथ देत पुणेकरांनी देशात सर्वाधिक मिळकत कर जमा केला. त्यामुळे कोरोनाच्या काळातही पालिकेचा आर्थिक गाडा रुळावर राहिला. पुणेकरांची हीच साथ कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतही कायम असून १ एप्रिल ते २८ मे या ५८ दिवसांमध्ये  ४ लाख ४३ हजार ३९९ पुणेकरांनी ५८५ कोटी १४ लाख रुपयांचा मिळकत कर जमा केला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत या वर्षी कर जमा होण्यात दुपटीने वाढ झाल्याचे कर आकारणी व कर संकलन विभागाचे प्रमुख विलास कानडे यांनी सांगितले.   

मागील वर्षी कोरोना काळात ०१ एप्रिल २०२० ते ३० सप्टेंबर २०२० या काळात संपूर्ण मिळकतकर भरलेल्या निवासी मिळकतधारकांना३१ मे २०२१ पूर्वी संपूर्ण मिळकतकर जमा केल्यास सर्व करांवर (शासनाचे कर वगळून) १५ टक्के  सवलत दिली जाणार आहे. चालू आर्थिक वर्षात २८ मेपर्यंत तब्बल ३ लाख ३६ हजार २९४ मिळकत धारकांना १५ टक्के सवलत मिळाली आहे. या मिळकतधारकांनी २५३ कोटी ३४ लाख रुपयांचा कर जमा केला असून त्यांना ४२ कोटी ०५ लाख रुपये सवलत मिळाली आहे.

याव्यतिरिक्त ज्या मिळकतधारकांची सर्वसाधारण कराची रक्कम २५ हजारांपेक्षा कमी आहे, त्यांना सर्वसाधारण करामध्ये १० टक्के सवलत दिली जाणार आहे. तसेच, ज्या मिळकतधारकांची सर्वसाधारण कराची रक्कम २५ हजारांपेक्षा पेक्षा जास्त आहे, त्यांना ५ टक्के सवलत देण्यात येत आहे. सवलत मिळण्याकरिता ३१ मेपूर्वी मिळकतकराची संपूर्ण रक्कम भरणे आवश्यक असल्याचे कानडे यांनी सांगितले. यंदाही नागरिकांनी डिजिटल पद्धतीने मोठ्या प्रमाणावर ऑनलाईन भरणा केला आहे. ------ भरणा पद्धत। मिळकती। टक्केवारी। रक्कम (कोटीत) डिजिटल। ३,४२,६६८। ७७.२८%। ३९४.७७ रोख। ५४,२४६। १२.२३। ४१.०१ धनादेश। ४६,४८५। १०.४८। १४९.३५

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाcorona virusकोरोना वायरस बातम्याTaxकर