शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

Omicron: ओमायक्रॉनचा सामना करण्यासाठी पुणे कॅन्टोन्मेंट सज्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2021 16:14 IST

रुग्णालयात सध्या ४ मोठी ऑक्सिजन जनरेटर प्लान्टस ऍक्टिव्ह आहेत त्यात एक लिक्विड ऑक्सिजन प्लांट आहे...

पुणे: पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड (Omicron Pune Cantonment Board) हद्दीत चार रुग्णांचे ओमायक्रॉन करोना विषाणू अहवाल पॉझिटिव्ह असल्याची माहिती महाराष्ट्र राज्याच्या आरोग्य विभागाने काल जाहीर करत कॅन्टोन्मेंटला कळवले होते. त्यानंतर लगेचच रात्रीच्या रात्री ओमायक्रॉन विषाणूसाठी पटेल रुग्णालयाने विशेष १५ बेडचे आयसोलेशन विभाग तयार करून ठेवले असल्याची माहिती निवासी वैद्यकीय अधीक्षक डॉ. उषा तपासे यांनी दिली.

पंधरा दिवसांपूर्वी कॅम्प भागातील एक नागरिक दुबईहून प्रवास करीत पुण्यात आला होता. त्यानंतर त्याची ओमायक्रॉन करोना तपासणी केली असता त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यानंतर त्याने लगेचच त्याच्या कुटुंबातील एक लहान मूल व दोन स्त्रियांची तपासणी करून घेतली असता त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यांना या विषाणूची अतिशय सौम्य लागण झाली असून त्यांच्या घराच्या विलागीकरणालाही १२ दिवस होऊन गेली असून सर्वांची तब्येत उत्तम आहे. सर्वांनी करोनाप्रतिबंधक लसीचे दोन डोस पूर्ण केले आहेत. यातील ३ जण सध्या भवानी पेठेत घरीच विलागीकरणात आहेत तर केवळ एक नागरिक कॅम्प भागातील घरात विलागीकरणात आहेत. 

याबाबतची माहिती काल राज्याच्या आरोग्य विभागाने कॅन्टोन्मेंट बोर्डाला देताच पटेल रुग्णालयाचे नोडल अधिकारी डॉ. प्रकाश भोसले यांच्या नेतृत्वाखाली १ डॉक्टर, ३ नर्स, रुग्णवाहिका अशी एक टीम रुग्ण राहत असलेल्या ठिकाणी तपासणीसाठी गेले. रुग्ण आणि त्याचा संपर्कात असलेल्या नागरिकांची शोध व तपासणी करण्याचे काम सुरू असून आवश्यक त्या ठिकाणी स्वाब देखील घेतले जातील. तसेच हे रुग्ण ज्या सोसायटीत राहतात त्यात ६० फ्लॅट आहेत त्या सर्वांची आर टी पी सी आर टेस्ट पोलीस बंदोबस्तात करण्यात येणार आहे अशी माहिती डॉ. भोसले यांनी दिली.

पटेल रुग्णालय ओमायक्रोनचा सामना करण्यासाठी सज्ज-कॅन्टोन्मेंटमध्ये आढळलेल्या ओमायक्रोन रुग्णाबाबत विचारले असता वैद्यकीय अधीक्षक डॉ. तपासे म्हणाले, सध्या आढलेल्या रुग्णांमध्ये ओमायक्रोनची सौम्य लक्षण आहेत. आम्ही सध्या ओमायक्रॉनसाठी १५ बेडचे विलागीकरण कक्ष काल रात्रीच तयार केले असून, आवश्यकता भासल्यास रुग्णालयाचा १२० बेडचा जनरल वॉर्ड देखील आम्ही रुग्णांसाठी परिवर्तित करून सध्या १० बेड चे अतिदक्षता विभाग करोना रुग्णांसाठी सुरू आहे, गरज भासल्यास आणखी १० म्हणजे एकूण २० अतिदक्षता विभागाचे बेड आमच्याकडे तयार आहेत.

रुग्णालयात सध्या ४ मोठी ऑक्सिजन जनरेटर प्लान्टस ऍक्टिव्ह आहेत त्यात एक लिक्विड ऑक्सिजन प्लांट आहे. सध्या ऑक्सिजन निर्मिती क्षमता एवढी आहे की इतर रुग्णालयाला देखील पटेल रुग्णालय ऑक्सिजन पुरवठा करू शकतो, आमच्या सर्व वैद्यकीय व अवैद्यकीय कर्मचाऱ्याने अलर्ट राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. कॅन्टोन्मेंट बोर्ड ओमीक्रीन चा समान करण्यासाठी तयार आहे, असंही डॉ. तपासे म्हणाले.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडOmicron Variantओमायक्रॉनCorona vaccineकोरोनाची लसCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस