शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

अध्यक्षपदासाठी चौरंगी लढत, पुणे बार असोसिएशन निवडणूक; १७ फेब्रुवारीला मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2018 13:12 IST

पुणे जिल्हा बार असोसिएशनच्या अध्यक्षपदाची निवडणूक चौरंगी होणार, हे आता स्पष्ट झाले आहे. हणमंत करजगीकर, भजनलाल निमगावकर, सुभाष पवार आणि प्रवीण येसादे या उमेदवारांमध्ये ही निवडणूक रंगणार आहे.

ठळक मुद्देकार्यकारिणी सदस्य पदासाठी ३१ अर्ज, ६ अर्ज नामंजूर, २५ अर्ज मंजूरयेत्या १७ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या निवडणुकीत ठरणार असोसिएशनचा अध्यक्ष

पुणे : पुणे जिल्हा बार असोसिएशनच्या अध्यक्षपदाची निवडणूक चौरंगी होणार, हे आता स्पष्ट झाले आहे. हणमंत करजगीकर, भजनलाल निमगावकर, सुभाष पवार आणि प्रवीण येसादे या उमेदवारांमध्ये ही निवडणूक रंगणार आहे. येत्या १७ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या निवडणुकीत असोसिएशनचा अध्यक्ष ठरणार आहे.बार असोसिएशनच्या उपाध्यक्षपदासाठी २ जागांसाठी भूपेंद्र गोसावी, संजीव जाधव, रेखा करंडे (दांगट), इब्राहिम शेख, सचिन झालटे (पाटील) हे पाच उमेदवार आहेत.  सचिव पदांच्या दोन जागांसाठीची लढत श्रीकृष्ण घुगे, लक्ष्मण घुले, गीतांजली कडते, विकास कांबळे, संतोष शिंदे आणि नगमा टंडन यांच्यात आहे. खजिनदार पदासाठी पूनम स्वामी आणि प्रतापराव मोरे, तर हिशेब तपासणीस पदाची लढत नागेश जेधे आणि सुदाम मुरकुटे हे सर्व उमेदवार रिंगणात आहे. पुणे बार असोसिशनचे माजी अध्यक्ष अ‍ॅड. एन. डी. पाटील या निवडणुकीसाठी मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत. अ‍ॅड. शिरीष शिंदे, अ‍ॅड. श्रीकांत आगस्ते, अ‍ॅड. हेमंत गुंड, अ‍ॅड. अभिजित भावसार, अ‍ॅड. सुप्रिया कोठारी, अ‍ॅड. अमोल जोग, अ‍ॅड. काळूराम भुजबळ आणि अ‍ॅड. रवि पवार हे उपमुख्य निवडणूक अधिकारी आहेत. 

दहा कार्यकारिणी सदस्यांची सोडत पद्धतीने निवड कार्यकारिणी सदस्य पदासाठी चेतन औरंगे, समीर भुंडे, आशिष गवारे, पंजाब जाधव, गणेश लेंडे, लक्ष्मी माने, प्रियदर्शनी परदेशी, योगेश पवार, रमेश राठोड आणि रफिक शेख या दहा जणांची सोडत पद्धतीने निवड करण्यात आली आहे. या कार्यकारिणी सदस्य पदासाठी ३१ अर्ज आले होते. त्यापैकी ६ अर्ज नामंजूर झाले. २५ अर्ज मंजूर झाले. त्यामध्ये २१ पुरुष उमेदवार होते, तर चार महिला उमेदवार होते. २१ पुरुष उमेदवारांपैकी ८, ४ महिला उमेदवारांपैकी दोन उमेदवारांची चिठ्ठ्या पद्धतीने निवड करण्यात आली.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड