पुणे : तरुणांना विदेशात, तसेच नामांकित कंपन्यांमध्ये नोकरी लावण्याचे आमिष दाखवून लाखो रुपये उकळणा-या दोघा चोरट्यांना सायबर गुन्हे शाखेने केलेल्या वेगवेगळ्या कारवाईत हरियाना, उत्तर प्रदेशातून अटक केली आहे.नितीन संतसिंग रतन पालम (गुडगाव हरियाना), आशिषकुमार सिंग (वय २६, रा. मातौर, पो. डौसला ता. सरदना, जि. मिरत, उत्तर प्रदेश), अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी सिंहगड रोड, चंदननगर व वाकड पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल आहेत.नºहे आंबेगाव येथील एका उच्चशिक्षित तरुणाला आयर्लंडमध्ये हॉटेल मॅनेजरची नोकरी लावून देण्याच्या बहाण्याने कन्सल्टन्सी फी, विमान तिकिटाचे पैसे, व्हिसा फी या बहाण्याने पैशांची मागणी केली. त्यानंतर बनावट ई मेल सर्टिफिकेट, व्हिसा ई-मेलवर पाठवून साडेआठ लाख रुपये खात्यावर भरण्यास लावून फसवणूक केली होती. सायबर गुन्हे शाखेच्या पथकाने तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास करून हरियानातील गुडगाव येथे राहणाºया नितीन संतसिंग रतन याला अटक करून त्याचा पासपोर्ट, १ मोबाईल, १ डोंगल, हार्डडिस्क व आंध्रा बँकेचे पासबुक जप्त केले. देशभरातील दहा ते बारा तरुणांना गंडा घालून तब्बल ३७ लाखांची फसवणूक केल्याचे तपासात समोर आले आहे.चंदननगर येथील एका तरुणाला शाईन कंपनीतून बोलत असल्याचे सांगून नोकरी लावण्याच्या बहाण्याने पैस भरायला लावून ११ हजारांची फसवणूक केली होती. तपास करताना सायबर गुन्हे शाखेने आशिषकुमार सिंग याला उत्तर प्रदेशातील गाजियाबाद येथून अटक केली. त्याच्याकडून १३ मोबाईल हँडसेट्स, ६५ सिमकार्ड, १ लॅपटॉप, १ एटीएम कार्ड व इतर साहित्य जप्त केले.
पुणे : नोकरीच्या आमिषाने गंडा घालणा-यांना अटक; हरियाना, उत्तर प्रदेशातून घेतले ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2017 05:02 IST