पुणे-आंधळे बस सेवा महापौरांनी केली सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:09 IST2021-02-05T05:09:30+5:302021-02-05T05:09:30+5:30

या मार्गावरील आंधळे, कातरखंडक, खांबोली, पिपोळी, जवळ, रिहे या गावातील व वाड्यावस्त्यावरील कामगार, दूध व्यवसायिक, भाजीपाला, विध्यार्थी, विशेष ...

Pune-Andhale bus service started by the mayor | पुणे-आंधळे बस सेवा महापौरांनी केली सुरू

पुणे-आंधळे बस सेवा महापौरांनी केली सुरू

या मार्गावरील आंधळे, कातरखंडक, खांबोली, पिपोळी, जवळ, रिहे या गावातील व वाड्यावस्त्यावरील कामगार, दूध व्यवसायिक, भाजीपाला, विध्यार्थी, विशेष आजारी, अबाल वृद्ध यांची प्रुवासासआय टी पार्क मध्ये कामावर जाणाऱ्या महिला भगिनींना खूप त्रास सहन करावा लागत होता तो दूर झाला. या बसमुळे ही अडचण दूर होणार आहे.

उदघाटन प्रसंगी आपल्या तालुक्यातील नागरिकांची प्रवासाची अडचण लक्षात घेऊन मुळशीचे सुपुत्र मुळशी भूषण पुण्यनगरीचे प्रथम नागरिक सन्माननीय महापौर मुरलीधर आण्णा मोहोळ यांनी झेंडा दाखवून बसचे उदघाटन केले यावेळी सभागृह नेते नगरसेवक श्रीकांत भिमाले पी एम पी एल चे अध्यक्ष शंकरभाऊ पवार नगरसेवक राजाभाऊ बराटे, शिवराम मेंगडे, पीएमपीएलचे अधिकारी झेंडे, जि. प.सदस्य शंकर मांडेकर, मधुरा भेलके उपस्थित होते.

नामदेव शिंदे बापूसाहेब मेंगडे, सरपंच अनिल मोरे, गणपत तिकोने, बाबाजी शेळके, बळीराम मालपोटे, माऊली पडाळघरे, बबन केमसे, नानासाहेब शिंदे, साहेबराव पडाळघरे, अनिल शिंदे, संभाजी ओझरकर, कमलेश ओझरकर ,दिलीप मोरे, सुरेश मोरे ,मच्छिद्र मोरे ,प्रमोद शिंदे ,गोपाळ शिंदे ,उमेश मोरे ,अतुल मोरे ,व रिहे ते आंधळे खोऱ्यातील ग्रामस्थ मोठया संख्येने हजर होते या वेळी रिहे ग्रासमपंचायत निवडून आलेल्या सदस्यांचा सत्कार करून त्यांना पुढील कारकीर्दीस शुभेच्छा महापौर मुरलीधर आण्णा मोहोळ यांनी दिल्या अशी माहीती अनिल मोरे व नानासाहेब शिंदे यांनी दिली

Web Title: Pune-Andhale bus service started by the mayor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.