शहरं
Join us  
Trending Stories
1
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
2
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
3
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
4
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
5
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
6
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
7
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
8
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
9
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
10
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!
11
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
12
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...
13
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
14
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
15
IND VS ENG : ऋषभ पंतनं केला षटकारांचा महाविक्रम, बेन स्टोक्स-मॅथ्यू हेडनलाही टाकलं मागे
16
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
17
Unplayable Delivery! आकाश दीपसमोर जो रुट चारीमुंड्याचित! विजयातील मोठा अडथळा दूर (VIDEO)
18
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
19
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट

Breaking : पुणे विमानतळ २६ ऑक्टोबरपासून रात्री ८ ते सकाळी ८ या वेळेत वर्षभर बंद राहणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2020 17:56 IST

वर्षभर हवाईदलामार्फत धावपट्टी दुरुस्तीचे काम सुरु राहणार

पुणे : धावपट्टीच्या देखभाल-दुरूस्तीच्या कामासाठी पुणेविमानतळ रात्री ८ ते सकाळी ८ या वेळेत पुढील वर्षभर बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे दि. २६ ऑक्टोबरपासून रात्रीच्यावेळी ये-जा करणाºया विमानांच्या वेळापत्रक बदलण्यात आले आहे. ही विमाने आता दिवसा उड्डाण करतील, अशी माहिती विमानतळ संचालक कुलदीप सिंग यांनी दिली.   

पुणे विमानतळ हे हवाई दलाचे असून धावपट्टीची देखभाल-दुरूस्तीही त्यांच्याकडूनच केली जाते. तसेच हवाई दलाच्या सरावादरम्यानही काही दिवसांपर्यंत विमानतळ प्रवासी वाहतुकीसाठी सकाळी बंद ठेवावे लागत होते. आता दि. २६ ऑक्टोबरपासून हवाई दलाकडून धावपट्टीच्या देखभाल-दुरूस्तीचे काम केले जाणार आहे. हे काम दररोज रात्री ८ ते सकाळी ८ यावेळेत पुढील वर्षभर सुरू राहणार आहे. सध्या यावेळेत विमानतळावरून २६ विमाने ये-जा करतात. धावपट्टीच्या कामांमुळे या विमानांच्या वेळा सकाळी ८ ते रात्री ८ या कालावधीत समाविष्ट करण्यात येणार आहेत. सध्या पुणे विमानळावरून दिल्ली, कोलकाता, अहमदाबाद, चेन्नई, बेंगलुरू, नागपुर, कोची, लखनौ, हैद्राबाद आदी मोजक्याच शहरांमध्ये विमानांची ये-जा सुरू आहे.

कुलदीप सिंग म्हणाले, धावपट्टीच्या दुरूस्तीचे काम केले जाणार असल्याने रात्रीच्या वेळी प्रवासी वाहतुक होणार नाही. पण त्यामुळे एकही विमान उड्डाण रद्द होणार नाही. रात्रीची सर्व विमाने दिवसाच्या वेळापत्रकामध्ये ये-जा करतात. कोरोनाच्या पार्श्वभुमीवर सध्या विमानतळावर आम्ही केलेल्या इमारतीच्या अभ्यासानुसार सोशल डिस्टन्सिंगमध्ये एका तासात जास्तीत जास्त ५०० प्रवासी ये-जा करू शकतात. तर एका तासात केवळ ४ विमानांचे उड्डाण व ४ विमाने उतरू शकतात. त्यामुळे सकाळी ८ ते रात्री ८ या वेळेत सुमारे ९० विमानांची ये-जा होऊ शकेल. सध्या हवाई दलाच्या विमानांचा सराव बंद आहे, त्यामुळे सकाळीही प्रवासी वाहतुक सुरू आहे.---------------विमानतळ प्राधिकरणाच्या नियमांनुसार सध्या प्रवासी वाहतुकीवर काही बंधने आहेत. त्यामुळे रात्री धावपट्टी बंद असली तरी फारसा परिणाम  होणार नाही. तसेच काम लवकरात लवकर पुर्ण करण्यासाठी हवाई दलाला विनंती करणार आहोत.- कुलदीप सिंग, विमानतळ संचालक----------------

दररोज सुमारे ९ हजार प्रवासीसध्या दररोज ९ हजार प्रवासी ये-जा करत आहेत. २०१८-१९ मध्ये ही संख्या वर्षाला ९० लाख एवढी होती. त्यानंतर त्यामध्ये मागील वर्षी ८० लाखापर्यंत घट झाली. कोरोना संकटामुळे विमान उड्डाणाला मर्यादा असल्याने जवळपास दररोज ९० विमानांचीच ये-जा होत आहे. पुर्वी हा आकडा १८० च्या जवळपास होता.------------

 

टॅग्स :Puneपुणेpune airportपुणे विमानतळairplaneविमानpassengerप्रवासी