शहरं
Join us  
Trending Stories
1
Pooja Khedkar Mother: ट्रकचालकाचे अपहरण करणारे पूजा खेडकरचे आई वडील फरार; गेटवरून उड्या मारून पोलीस पोहोचले घरात
2
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसा; चुराचांदपूरमध्ये कुकी नेत्यांची घरं जाळली! दोनच दिवसांपूर्वी मोदींनी केला होता दौरा
3
सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचा भाव
4
होय... ५० हजारांच्या पगारात २ कोटींचा फंड शक्य आहे! फोलो करा ५०-३०-१०-१० चा गुंतवणूक फॉर्म्युला
5
Urban Company IPO तुम्हाला लागलाय का, कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस?
6
“भारत-पाकिस्तान सामना फिक्स होता; PCB ला 1000 कोटी मिळाले’’, संजय राऊतांचा गंभीर आरोप
7
भय इथले संपत नाही! मंकीपॉक्सनंतर नव्या व्हायरसचं संकट; 'ही' आहेत लक्षणं, 'या' लोकांना धोका
8
7 वर्षांच्या वॉरंटीसह Royal Enfield ने लॉन्च केली नवीन Meteor 350; GST कपातीनंतर किंमत फक्त...
9
चीनचं शटर होऊ लागलंय बंद! सरकारनं वाजवली धोक्याची घंटा; नक्की काय आहे प्रकरण, जाणून घ्या
10
भारताविरुद्ध पाकिस्तानला दिली साथ, आता 'या' देशावर भीतीचं सावट; इस्रायली हल्ल्याची सतावतेय भीती
11
राहुची महादशा, अशुभच घडतेय? ‘हे’ ८ उपाय करून तर पाहा, शुभ-लाभ; दोषमुक्ती, भरपूर भरभराट!
12
निष्पाप सान्वीचा जीव गेला; शाळांचा सुरक्षेपेक्षा 'प्रॉफिट'वर डोळा, कंत्राटदाराच्या कामामुळे दोघे जिवाला मुकले
13
एकमेकांसोबत आयुष्य जगण्याचं स्वप्न अधुरेच राहिले; नाशिकमध्ये प्रेमीयुगुलाने 'हावडा' एक्स्प्रेसवर मारल्या उड्या
14
बाथरुममधील बादली खूपच खराब झालीय? एकही रुपया खर्च न करता 'अशी' दिसेल नव्यासारखी
15
कतरिना कैफ प्रेग्नंट, 'या' महिन्यात देणार बाळाला जन्म; विकी कौशल लवकरच होणार बाबा
16
ITR Filing मध्ये Gen Z नं बनवला नवा विक्रम; शेअर बाजारातील गुंतवणूक बनली कमाईचं नवं साधन
17
शेअर आहे की तुफान! ५ वर्षात तब्बल ६६,००० टक्के नफा! आज पुन्हा ९ टक्के वाढ; किंमत २५ पेक्षाही कमी
18
डिझेलवाले सुटले...? नाही, पेट्रोलसारखेच इथेनॉल मिसळायचे होते, पण...; नितीन गडकरींच्या मनात चाललेय तरी काय...
19
"तू जाताच पूजा यायची अन् पूर्ण दिवस आम्ही..."; नंदिनी हत्याकांडात ऑडिओ क्लीपनं नवा ट्विस्ट
20
चांगली भूमिका, चांगल्या सिनेमाचं आमिष, अभिनेत्रीवर बलात्कार, प्रसिद्ध अभिनेता अटकेत

Pune Airport : अपघातामुळे प्रवासीसंख्या घटणार; किमान दोन महिने परिणाम शक्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2025 10:47 IST

पुढील एक-दाेन महिने विमान प्रवास करणे टाळायचे ठरवले आहे, असे विमान प्रवासी ॲड. अभिषेक उपाध्ये यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

-अंबादास गवंडीपुणे : मी जूनअखेरला कामानिमित्त लंडनला जाणार होतो. तिकीटदेखील काढले होते. परंतु गुरुवारी (दि. १२) अहमदाबाद येथे घडलेल्या विमान अपघातामुळे मनामध्ये प्रचंड भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे पुढील प्रवास रद्द केला आहे. अपघाताचे भयानक चित्र डोळ्यांसमोर वारंवार येते. त्यामुळे पुढील एक-दाेन महिने विमान प्रवास करणे टाळायचे ठरवले आहे, असे विमान प्रवासी ॲड. अभिषेक उपाध्ये यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. यामुळे पुढील महिने विमान प्रवासी घटतील, असा दुजोरा हवाई तज्ज्ञांनीदेखील दिला आहे.

अहमदाबाद - लंडनला जाणारे बोइंग विमान कोसळून गुरुवारी २४१ विमान प्रवाशांचा मृत्यू झाला. यामुळे भारतीय हवाई क्षेत्राच्या असलेल्या विश्वासार्हतेला हादरा बसला आहे. देशात ७०० ते ८०० विमाने असून, देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणे होतात. परंतु बाेइंग विमानाच्या अपघातामुळे भीतीपोटी अनेक प्रवासी पर्यायी साधनांचा वापर करण्याची तयारी केली असून, एकत्र कुटुंबाने जाणारे असतील तर ते टाळून वेगवेगळ्या विमानातून प्रवास करण्याचे नियोजन करत असल्याचे बोलत आहेत.

तसेच विमान अपघातामुळे विविध घटकांवर परिणाम होणार असून, याचे आकर्षण असणारे तरुण-तरुणी दुसरा पर्याय निवडतील, शिवाय हवाई प्रवासासाठी असलेल्या विमा कंपन्यांकडून विम्याचे दर वाढविण्यात येतील, असा दावा हवाई अभ्यासक करत आहेत. 

अभ्यासक म्हणतात...

-देशांतर्गत प्रवासासाठी नागरिक वंदे भारत, शताब्दी, राजधानी अशा रेल्वे गाड्यांना प्राधान्य देतील.

-पुढील किमान पाच ते सहा महिने विमान प्रवाशांची संख्या लाखोने घटणार असून, याचा परिणाम विमान सेवेवर होणार आहे.

-हवाई क्षेत्रात पायलट, एअर होस्टेस या क्षेत्रात येणारे तरुण-तरुणी पर्यायी आणि सुरक्षित क्षेत्र निवडतील.

-विमा कंपन्यांकडून प्रवाशांची प्रचंड लूट होईल.

-कामानिमित्त वारंवार विमान प्रवास करणाऱ्यांची संख्या कमी होईल.

-विशेषत: ज्येष्ठांची संख्या घटणार असून, ते प्रवास करण्याचे टाळतील. 

माझे अनेक नातेवाईक, मित्र परिवार परदेशात स्थायिक आहेत. कधी कामामुळे किंवा कधी भेटण्याच्या निमित्ताने अधूनमधून परदेशात जाणे होते. दिवाळीच्या आसपास सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यात अमेरिकेत जायचा प्लॅन पण केला होता, परंतु कालच्या अपघातामुळे तो कॅन्सल केला आहे. विमान अपघाताच्या घटनेमुळे मन अतिशय व्यथित झाले असून, सध्याच्या परिस्थितीत तरी कोठे जायचा विचार नाही. जे प्रवासी मृत पावले त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. - आनंद सप्तर्षी, प्रवासी   

माझ्या विविध कामांमुळे महिन्यातून एक-दोनदा परदेशात जाणे होते. परंतु काल जी घटना घडली, ती मनाला हादरवून सोडणारी आहे. फोटो पाहिले की अंगावर काटे येतात. कालपासून पाहुण्यांकडून माझी चाैकशी केली जाते. परंतु जीवन म्हणजे कटपुतळी बाहुली आहे. या अपघातामुळे मनावर खूप परिणाम झाला आहे. त्यामुळे पुढील काही महिने विमान प्रवास करायचे टाळणार आहे. - उषा सूर्यवंशी, व्यावसायिक 

गुरुवारी जी घटना घडली आहे, ती भयानक आणि मनावर दीर्घकाळ परिणाम करणारी आहे. विमान प्रवास सुरक्षित आणि सुपर आहे. परंतु अशा घटनेमुळे मनाचे खच्चीकरण होते. विमान प्रवास करताना हजार वेळा विचार मनात येतात. परंतु नियोजन केलेला प्रवास आता रद्द केला आहे. - ॲड. अभिषेक उपाध्ये, प्रवासी

टॅग्स :PuneपुणेAirportविमानतळpune airportपुणे विमानतळMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड