पुणे- अहमदनगर रस्ता झाला सुनसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:12 IST2021-04-11T04:12:09+5:302021-04-11T04:12:09+5:30
एरव्ही एक मिनीटही शांत नसणाऱ्या अहमदनगर रोडवरील वाघोली, लोणीकंद आणि पेरणे गाव अक्षरश: दिवसभरासाठी जणू पॉज झाले होते. ...

पुणे- अहमदनगर रस्ता झाला सुनसान
एरव्ही एक मिनीटही शांत नसणाऱ्या अहमदनगर रोडवरील वाघोली, लोणीकंद आणि पेरणे गाव अक्षरश: दिवसभरासाठी जणू पॉज झाले होते. कोरोना रोखण्यासाठी विकएंड ला केलेल्या लॉकडाऊन प्रशासनाने केलेल्या अवाहनास नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने प्रतिसाद दिला.
शुक्रवारी (ता. ९) सायंकाळी ६ पासून हा स्वयंस्फुर्त लॉकडाऊन सुरु झाले.
शनिवारी सकाळ पासूनच पेरणेगाव गावठानकडे जाणारे सर्व रस्ते व रामनगर कडून येणारे रस्ते फलक लाऊन बंद होते
कोरोना संसर्गाचा वाढता धोका लक्षात घेत सुरक्षेसाठी पेरणे लोणीकंद परिसरात बंदीचे पूर्णपणे पालन होत होते. मुख्य रस्त्यावर तर आतल्या रस्त्यावर वाहतूक तुरळक होती. बाजार पेठा बंद होत्या. गाव १०० टक्के 'लॉकडाऊन' मध्ये सहभागी झाले होते.
लोणीकंद गाव लॉक डाऊनमुळे गावातील मुख्य रस्ता व अंतर्गत रस्ते निर्मनुष्य झाले. मेडिकल, हॉस्पिटलसह सर्व अत्यावश्यक सेवा वगळता
संपुर्ण गाव परिसरात किराणा, भाजीपाला, कापडदुकान, हॉटेल धाबे पूर्णत: बंद होते.
लोणीकंद पोलीस निरिक्षक प्रताप मानकर यांच्या मार्गदर्शन खाली चौकाचौकात चोक बंदोबस्त ठेवण्यात आला होता दहा मोटार सायकल स्वरावर दंडात्मक कार्यवाही करण्यात आली.
--
फोटोो १० लोणीकंद लॉकडाऊन
फोटोओळी : पेरणे (ता. हवेली) : पुणे - अहमदनगर मुख्य नगर परिसरात पोलिसांनी केलेली नाकाबंदी