शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

पुण्याच्या कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक होणारच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2018 21:14 IST

जिल्हा सहकार उपनिबंधकांनी प्रशासकाची नियुक्ती ही दोन वर्षांसाठी असल्याचे सांगत निवडणुक प्रक्रिया थांबविण्या विषयीचा अभिप्राय प्राधिकरणाला दिला होता. 

ठळक मुद्देप्रक्रिया सुरु ठेवा :सहकार प्राधिकरणाचे आदेशप्राधिकरणाच्या वतीने निवडणुकीची प्रक्रिया थांबविण्यास स्पष्ट नकार

पुणे: - कृषी उत्पन्न बाजार समिती पुणेचे संरचना बदलून नवीन बाजार समिती अस्तित्वात आल्याने सुरू असलेली निवडणुक प्रक्रिया थांबवावी किंवा कसे याबद्दल स्पष्ट आदेश करावे, असे लेखी पत्र बाजार समितीच्या वतीने सहकार निवडणूक प्राधिकरणाला दिले होते. या पत्रावर प्राधिकरणाच्या वतीने निवडणुकीची प्रक्रिया थांबविण्यास स्पष्ट नकार दिला असून, मतदार यादीचा कार्यक्रम सुरुच ठेवण्यास सांगितले आहे. बाजार समितीची संरचना बदलताना जिल्हा सहकार उपनिबंधक यांनी पणन अधिनियम कलम १३ (ए) नुसार समितीचे कार्यक्षेत्र पुणे, पिंपरी चिंचवड शहर आणि हवेली तालुका हे निश्चित करून तेथील प्रशासक मंडळ संपुष्टात आणून प्रशासक म्हणून बी.जे.देशमुख यांची नियुक्ती केली. नवीन बाजार समितीचे गठण झाल्याने समितीच्या संचालक मंडळाची सुरू असलेली निवडणूक प्रक्रिया तशीच पुढे चालू ठेवावी अथवा थांबवावी याबद्दलची धारणा पक्की करण्यासंदर्भात प्रशासकांनी प्राधिकरणाला पत्र दिले होते. तसेच जिल्हा सहकार उपनिबंधकांनी प्रशासकाची नियुक्ती ही दोन वर्षांसाठी असल्याचे सांगत निवडणुक प्रक्रिया थांबविण्या विषयीचा अभिप्राय प्राधिकरणाला दिला होता. राज्य सहकार निवडणुक प्राधिकरणाचे आयुक्त मधुकर चौधरी यांनी यासंदर्भात प्राधिकरणाच्या विधी सल्लागाराकडून अभिप्राय घेतला. तसेच प्राधिकरणाचे मत व्यक्त करून बाजार समितीची निवडणुक प्रक्रिया थांबविता येणार नाही. अथवा सक्षम प्राधिकारी नाही म्हणून निवडणुक घेऊ नये अशी आपली धारणा पक्की करता येणार नाही, असे स्पष्ट केले आहे. याबाबत त्यांनी निवडणुक उपजिल्हाधिकारी आणि जिल्हा सहकार उपनिबंधक यांनाही कळविले आहे.

टॅग्स :PuneपुणेagricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रMarket Yardमार्केट यार्ड