शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
2
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
3
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
4
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
5
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
6
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
7
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
8
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
9
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज
10
शंकर महादेवन यांनी खरेदी केलं चलतं-फिरतं लक्झरीअस हॉटेल! 'मसाज सीट'सह मिळतात या खास ५ स्टार सुविधा
11
अर्ध्या तासाच्या अंतराने कोसळले अमेरिकेचे हेलिकॉप्टर आणि विमान, दक्षिण चीन समुद्रात नेमकं काय घडलं?
12
वर्ल्डकप विजेता कर्णधार MS Dhoni केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या भेटीला, Video केला शेअर
13
अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यालयात 'वाजले की बारा' लावणी; सुनेत्रा पवारांचा थेट शहराध्यक्षांना कॉल
14
"व्हायरल होईल माहित होतं पण...", आर्यन खानच्या सीरिजमधील कॅमिओवर इम्रान हाश्मी म्हणाला...
15
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सेमीफायनलपूर्वी भारतीय महिला संघाला मोठा धक्का, दुखापतीमुळे आघाडीची फलंदाज स्पर्धेबाहेर 
16
निवडणूक आयोगाने देशात 'मतदार यादी दुरुस्ती' मोहिमची घोषणा केली; या १२ राज्यांमध्ये होणार सुरुवात, असे असणार वेळापत्रक
17
घराणेशाहीचं राजकारण आता चालणार नाही; ठाकरे बंधूंवर अमित शाहांचा निशाणा, म्हणाले...
18
शेअर बाजार 'रॉकेट'! PSU बँक, रियल्टी आणि ऑटो स्टॉक्सला मागणी; पहा सेन्सेक्सच्या टॉप ५ कंपन्या
19
दोन जणांची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये लैंगिक छळ अन् 'HIV'चा उल्लेख...! अरुणाचल पोलिसांकडून फरार IAS अधिकाऱ्याला अटक 
20
कंगना रणौत भटिंडा न्यायालयात हजर, शेतकरी आंदोलनादरम्यान केलेल्या 'त्या' टिप्पणीबद्दल मागितली माफी

पुणे : रेल्वेची अडेलतट्टू भूमिका ; मालधक्का बंदविरोधात मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2017 06:50 IST

अचानक बंद केलेला पुणे रेल्वे मालधक्का पुन्हा सुरू करावा, या मागणीसाठी हमाल संघटना व हुंडेकरी असोसिएशनने बाजार बंद ठेवून शुक्रवारी मोर्चा काढला होता.

पुणे : अचानक बंद केलेला पुणे रेल्वे मालधक्का पुन्हा सुरू करावा, या मागणीसाठी हमाल संघटना व हुंडेकरी असोसिएशनने बाजार बंद ठेवून शुक्रवारी मोर्चा काढला होता.अकरा दिवसांपासून हमाल आणि हुंडेकºयांचे धरणे आंदोलन सुरू आहे; मात्र रेल्वे प्रशासनाने त्याची कोणतीही दखल घेतलेली नाही. डॉ. बाबा आढाव यांच्या नेतृत्वाखाली विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालयावर निघालेल्या मोर्चानंतरही रेल्वे व्यवस्थापकांनी आपली अडेलतट्टू भूमिका कायम ठेवली. मालधक्का कधी चालू करू, याबद्दल काहीही सांगण्यास असमर्थतता व्यक्त केली. पुढील ३ दिवसांच्या रेल्वे कार्यालयाच्या सुट्यांनंतर मंगळवारी २६ डिसेंबरला, सकाळी ११ वाजता रेल्वे व्यवस्थापक कार्यालयावरील सभेत आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यात येणार आहे.आज सकाळी ११ वाजता मालधक्का येथून मोर्चा निघाला. मोर्चात हमाल पंचायत, ट्रान्सपोर्ट व डॉक वर्कर्स युनियन व हुंडेकरी असोसिएशन संघटना सहभागी होत्या. ससून, जिल्हाधिकारी कचेरी, पुणे स्टेशनमार्गे रेल्वे व्यवस्थापक कार्यालयावर आला. मोर्चात ‘मालधक्का पुन्हा सुरू झालाच पाहिजे, हमालांना रोजगार-हुंडेकºयांना व्यापार मिळालाच पाहिजे, पुण्याचा व्यापार वाढवा-धक्का पुन्हा सुरू करा, धक्का अचानक बंद करणाºया रेल्वे व्यवस्थापकांचा धिक्कार असो’ अशा घोषणा दिल्या जात होत्या.निवासी जिल्हाधिकारी राजेंद्र मुठे यांना नितीन पवार, राजेंद्र तरवडे, मधुकर भोंडवे यांच्या शिष्टमंडळाने निवेदन दिले. त्यावर निर्माण झालेल्या परिस्थितीविषयी रेल्वे प्रशासनाशी जिल्हा प्रशासन बोलेल व मार्ग काढण्याचा प्रयत्न करेल, असे मुठे म्हणाले.रेल्वे व्यवस्थापक कार्यालयात विभागीय व्यवस्थापक मिलिंद देऊसकर यांच्याशी वरील शिष्टमंडळाने चर्चा केली. त्यावर रेल्वे रुळानजीक झोपड्या काढल्यानंतर रेल्वेरुळांची डागडुजी करू. नंतरच धक्का चालू होईल. ११ डिसेंबरच्या चर्चेदरम्यानचीच भूमिका देऊसकरांनी मांडली. पयार्यी कसलीही व्यवस्था नसल्याचे ते म्हणाले.रेल्वे अधिकारी तालेवाराप्रमाणे वागत आहेत. त्यांना गरीब हमालांविषयी कसलीही कणव नसून आपलाच हेका ते चालवत आहेत. रेल्वे मार्गाच्या बाजूला फक्त पुण्यातच झोपड्या आहेत का? आणि त्या एका दिवसात झाल्यात का? झोपड्या होताना रेल्वे अधिकारी काय झोपा काढत होते? असे बिनकामाचे विभागीय व्यवस्थापक कार्यालय बंद पाडल्याशिवाय आम्ही राहणार नाही.- डॉ. बाबा आढाव

टॅग्स :Puneपुणे