शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

Pune: लोणावळा शहरातील गाजलेल्या गंभीर अशा दुहेरी हत्याकांडातील १३ आरोपींची निर्दोष मुक्तता

By नम्रता फडणीस | Updated: March 29, 2024 19:55 IST

Pune: लोणावळा शहरातील गाजलेल्या गंभीर अशा दुहेरी हत्याकांडातील सर्व आरोपींची वडगाव मावळ जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एस.एस. पल्लोड यांनी पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता केली. या गुन्हयात मूळ 14 आरोपी होते.

- नम्रता फडणीस  पुणे - लोणावळा शहरातील गाजलेल्या गंभीर अशा दुहेरी हत्याकांडातील सर्व आरोपींची वडगाव मावळ जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एस.एस. पल्लोड यांनी पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता केली. या गुन्हयात मूळ 14 आरोपी होते. मात्र मुख्य आरोपी किसन परदेशी याचा खटल्यादरम्यान मृत्यू झाल्याने गुन्हयातील 13 आरोपी निर्दोष सुटले आहेत.

लोणावळा शहरातून राजेश भारत पिंपळे (वय-२९, रा. कैलास नगर लोणावळा)  व अक्षय ऊर्फ सोन्या श्रीपाल गायकवाड (वय-२७ रा. लोणावळा ता. मावळ जि. पुणे)  हे दोघे दि. १८ जुलै २०१५ पासून बेपत्ता झाले होते. दि. २० जुलै रोजी अक्षयचे वडील श्रीपाल श्रवण गायकवाड (रा. सिध्दार्थ नगर, लोणावळा) यांनी लोणावळा शहर पोलिस ठाण्यात मनुष्य मिसिंगची तक्रार दिली होती.

लोणावळा शहर पोलिस करीत असताना राजेश भारत पिंपळे आणि अक्षय ऊर्फ सोन्या श्रीपाल गायकवाड या दोघांना लोणावळा शहरातील आरोपी किसन नथू परदेशी (रा. गावठाण, लोणावळा ता. मावळ) याने अंडा भुर्जीच्या गाडीच्या जागेवरून व जागेच्या भाड्यावरून झालेल्या भांडणाचा राग डोक्यात ठेवून वरील दोन्ही मुलांना बळजबरीने स्वतःच्या कारमध्ये बसवून कुठेतरी घेऊन जाऊन त्यांचा खून करून, दोघांची प्रेतं मुळशी तालुक्यातील ताम्हिणी घाटात खोल दरीत फेकून देऊन, खुनाचा पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला असल्याचे तपासातून निष्पन्न झाले. त्यानंतर  लोणावळा शहर पोलिस ठाण्यात दि. ४ ऑगस्ट २०१५ रोजी खुनाचा कट कारस्थान करून पळवून नेऊन खून केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. दि १८ सप्टेंबरला किसन परदेशी व त्याचे साथीदार आरोपी शारदा उर्फ आप किसन परदेशी (वय-४९), यास्मिन लतीफ सैयद(वय-३६), अजय कॄष्णण केसी (वय-२२), अश्विन चंद्रकांत शिंदे (वय-२९) , सुनील बाबू पटेकर (वय-४९), विकास उर्फ गोग्या सुरेश गायकवाड (वय-२४),जगदीश उर्फ जग्गू मोरे, सादिक इब्राहिम बंगाली, विनायक उर्फ विनय ढोरे,आकाश सतीश चांडिल्य, ब्रिजेश उर्फ बंटी डावरे, सलीम शेख, सुभाष उर्फ महाराज गोविंद धाडगे या १४ आरोपींना संशयावरून लोणावळा शहर पोलिसांनी दोघांच्या खून प्रकरणी अटक केली होती.

लोणावळा शहर पोलिसांनी सखोल तपास करीत या खुनाच्या गुन्ह्यात एकूण १४ आरोपींच्या विरोधात वडगाव मावळ येथील जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोप पत्र दाखल करण्यात आले होते. आरोपींच्या वतीने पुण्यातील ॲड मिलिंद द. पवार, ॲड. झाहिद कुरेशी, ॲड.अतुल गायकवाड, ॲड. अनिकेत जांभूळकर, ॲड. सूरज देसाई, ॲड.विनायक माने, ॲड.व्ही.आर. राऊत, ॲड.आर.जी.कांबळे यांनी काम पाहिले. खटला गंभीर स्वरुपाचा असल्याने खटल्याचे कामकाज पाहण्यासाठी सरकारने विशेष सरकारी वकीलांची नेमणूक केली होती. सरकार पक्षाच्या वतीने न्यायालयात १४ साक्षीदारांच्या साक्ष नोंदवण्यात आल्या.  आरोपींना लोणावळा शहर पोलिसांनी न झालेल्या खुनाच्या खटल्यात विनाकारण गोवले असल्याचा युक्तिवाद आरोपींच्या वकिलांनी न्यायालयात केला. हा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPuneपुणे