शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

पुणे : पूर्ववैमनस्यातून कोयत्याने वार करुन दोघांच्या हत्येचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2018 11:18 IST

पूर्ववैमनस्यातून आठ ते दहा जणांनी दोन जणांवर कोयत्याने डोक्यात वार करत त्यांची हत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे.

पुणे : पूर्ववैमनस्यातून आठ ते दहा जणांनी दोन जणांवर कोयत्याने डोक्यात वार करत त्यांची हत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. सातारा रोडवरील धनकवडे पेट्रोल पंपासमोर रविवारी (1 एप्रिल) रात्री 8.30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. या हल्ल्यात हर्तिक सोनवणे (वय 18 वर्ष ) आणि दत्तात्रये पाटोळे जखमी झाले आहेत. या दोघांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हर्तिक सोनवणेनं सहकारनगर पोलिसांकडे फिर्याद दिल्यानंतर याप्रकरणी सहकारनगर पोलिसांनी राजू कचरावत, शुभम कसबे व त्याच्या आठ ते दहा साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हर्तिक सोनवणे व दत्तात्रय पाटोळे हे रविवारी रात्री धनकवडे पेट्रोल पंपाजवळ उभे असताना राजू कचरावत व त्याचे साथीदार तेथे आले. त्यांनी जुन्या भांडणाच्या कारणावरुन कोयत्याने हर्तिकच्या कपाळावर, पाठीवर, डाव्या हातावर सपासप वार करुन त्यांना जबर जखमी केले. त्याचवेळी त्याचा मित्र दत्तात्रय पाटोळे यांच्या डोक्यात वार करुन त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. दोघेही गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक कोळी करीत आहेत.

 

टॅग्स :PuneपुणेMurderखून