शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

Pune: ३५ वर्षीय मजुराची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या, वडकीतील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2024 12:14 IST

ही घटना वडकी (ता. हवेली) येथे गुरुवारी(दि.११) सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली...

लोणी काळभोर (पुणे) : वडकी येथील ३५ वर्षीय मजुराने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना वडकी (ता. हवेली) येथे गुरुवारी(दि.११) सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. रवींद्र उर्फ रवी लक्ष्मण पवार असे आत्महत्या केलेल्या मजुराचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रवींद्र उर्फ रवी पवार एक मजूर असून वडकी परिसरात मिळेल ते काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. रवी पवार हे बुधवारी (दि.१०) रात्री संध्याकाळी बेडरूमचा दरवाजा बंद करून झोपले होते. दुसऱ्या दिवशी गुरुवारी (दि.११) सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास रवी पवार यांच्या पत्नीने त्यांना उठविण्यासाठी दरवाजा वाजवीला मात्र, आतून कोणताही प्रतिसाद नाही आला. त्यांना वाटले की, रवी पवार हे गाढ झोपेत असतील. परंतु सकाळचे अकरा वाजले तरीही रवी पवार उठले नसल्याने, त्यांच्या पत्नी पुन्हा त्यांना आवाज देऊन दरवाजा जोरजोराने वाजवला परंतु तेव्हाही आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.

त्यानंतर त्यांनी शेजारील नागरिकांच्या मदतीने बेडरूमचा दरवाजा तोडला. तेव्हा रवी पवार हे ओढणीच्या सहाय्याने फॅनला गळफास घेऊन लटकलेल्या अवस्थेत आढळून आले. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच लोणी काळभोर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने रवी पवार यांना खाली काढले. त्यानंतर त्यांना उपचारासाठी एका खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आले. मात्र, तेथील डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.

रवी पवार यांचा शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर मृत्यूचे कारण समोर येईल. रवी पवार यांनी आत्महत्या का केली? त्या दृष्टीने पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार महेश भोंगळे करीत आहेत.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड