शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

Pune: बटाट्याच्या पाला खाल्यामुळे विषबाधा, २० गाईंचा मृत्यू;  १५ ते २० लाखांचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2023 17:09 IST

आतापर्यंत १० ते १५ लाखाचे नुकसान झाले असून अजून गाई दगावल्यास त्यांचे ५० ते ६० लाखांचे नुकसान होण्याची शक्यता आहे....

निरगुडसर (पुणे) : बटाट्याचा पाला खाऊन विषबाधा झाल्याने राजस्थानी गाई व्यवसायिकांच्या १६ मोठ्या गाई ४ कालवडी अशा एकूण २० गाई मृत्युमुखी पडल्या आहेत. ही घटना निरगुडसर (ता.आंबेगाव) येथे घडली असून अजून ३० ते ४० गायानाहीं विषबाधा झाली आहे. त्यात विषबाधा झालेल्या आणखी काही गाई दगावण्याची शक्यता आहे. आतापर्यंत १० ते १५ लाखाचे नुकसान झाले असून अजून गाई दगावल्यास त्यांचे ५० ते ६० लाखांचे नुकसान होण्याची शक्यता आहे.

निरगुडसर मेंगडेवाडी हद्दीवरील रस्त्यावर राजस्थान येथून आलेले लालगाई वाले गेल्या अनेक वर्षापासून वास्तव्यास आहेत. त्यांच्याकडे १५० गाई, वासरे आहेत. ते आपला उदरनिर्वाह करण्यासाठी लाल गाई पाळतात. दुग्ध व्यवसाय व शेणखत विक्री करुन ते कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असतात. तसेच निरगुडसर व आजूबाजूच्या परिसरातील फ्लावरचा पाला, बटाट्याचा पाला, कांद्याची पाथ व शेतकऱ्यांच्या शेतात सोडून दिलेला भाजीपाला, तरकारी ते त्यांचे गायांना खाण्यासाठी घेऊन येत असतात.

दोन दिवसांपूर्वी हिरा खोडा भरवाड, काना वामा भरवाड, देवकन गंगाजी भरवाड यांनी थोरांदळे येथील एका शेतकऱ्याचा शेतात कापून ठेवलेला बटाट्याचा पाला गायांना खाण्यासाठी आणला होता. हा पाला खाल्ल्यानंतर त्यांच्या गायांना विषबाधा झाली व २० लहान मोठी जनावरे आतापर्यंत मृत्युमुखी पडली आहेत. तर ३० ते ४० गायाही मरणाच्या दारात आहेत. पशुवैद्यकीय अधिकारी यांच्याकडून गायांवर औषध उपचार सुरु आहेत.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड