जाधव यांच्या ‘योगयज्ञ’चे प्रकाशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:13 IST2020-12-30T04:13:52+5:302020-12-30T04:13:52+5:30
पुणे :“निरामय आरोग्य व मनःशांतीसाठी नियमित योगासनांचा निश्चितच मोठा फायदा आहे. ‘योगयज्ञ’ पुस्तकामुळे सर्वांचा योगाभ्यासाकडे कल वाढेल व धकाधकीच्या ...

जाधव यांच्या ‘योगयज्ञ’चे प्रकाशन
पुणे :“निरामय आरोग्य व मनःशांतीसाठी नियमित योगासनांचा निश्चितच मोठा फायदा आहे. ‘योगयज्ञ’ पुस्तकामुळे सर्वांचा योगाभ्यासाकडे कल वाढेल व धकाधकीच्या जीवनशैलीत सकारात्मकतेसह शारीरिक व मानसिक स्वास्थ बळकट ठेवण्यासाठी योगाभ्यासाला प्राधान्य मिळेल’, असे मत महावितरणचे मुख्य अभियंता सचिन तालेवार यांनी व्यक्त केले.
महावितरणचे कर्मचारी व योगप्रशिक्षक सुरेश जाधव लिखित ‘योगयज्ञ’ पुस्तकाचे प्रकाशन महावितरणचे तालेवार यांच्या हस्ते मंगळवारी (दि. २९) झाले. यावेळी ते बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अधीक्षक अभियंता प्रकाश राऊत, सहायक महाव्यवस्थापक (मानव संसाधन) ज्ञानदा निलेकर, कर्मचारी नेते तुकाराम ठिंबळे, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी शिरीष काटकर उपस्थित होते.
‘‘महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी स्वतःसाठी थोडा वेळ काढून दैनंदिन योगाभ्यास करावा. त्यामुळे आरोग्य कायम राहण्यासोबतच कार्यक्षमता देखील वाढीस लागेल,” असे उपस्थित होते. जनसंपर्क अधिकारी निशिकांत राऊत, उपकार्यकारी अभियंता मुकेश जोशी, संतोष पटनी, सुजित विभुते, जनार्दन शिवरकर, बापूराव नरोटे आदी यावेळी उपस्थित होते.