‘तू माझा सांगाती’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:14 IST2021-08-17T04:14:57+5:302021-08-17T04:14:57+5:30

पुणे : ‘तू माझा सांगाती’ हा काव्यसंग्रह विविधांगी व सकारात्मक विचारांचा असून तो माणसांना जीवनात प्रेरणा देणारा आहे. ...

Publication of the collection of poems 'Tu Mazha Sangati' | ‘तू माझा सांगाती’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन

‘तू माझा सांगाती’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन

पुणे : ‘तू माझा सांगाती’ हा काव्यसंग्रह विविधांगी व सकारात्मक विचारांचा असून तो माणसांना जीवनात प्रेरणा देणारा आहे. अत्यंत सहज आणि सुलभतेने या पुस्तकात काव्यरचना उमललेल्या आहेत, अशा भावना ‘तू माझा सांगाती’ हा काव्यसंग्रह प्रकाशन समारंभात उपस्थितांनी व्यक्त केल्या.

ज्ञानमुद्रा पब्लिकेशन प्रकाशित व कवयित्री वैशाली कलमानी यांच्या ‘तू माझा सांगाती’ या कवितासंग्रहाचा प्रकाशन सोहळा नुकताच बाणेर येथे सरला चांदेरे यांच्या हस्ते संपन्न झाला़ या वेळी लेखिका पूजा सामंत, ज्ञानमुद्रा पब्लिकेशनच्या संचालिका डॉ. माधुरी वतुर्ले व शीतल देशमुख, कवी सतीश गोरे, नितीन कळमकर, माणिक गांधिले, विशाल विधाते, शेखर सायकर आदी उपस्थित होते.

------------------------

फोटो- तू माझा सांगाती

Web Title: Publication of the collection of poems 'Tu Mazha Sangati'