शांततेसाठी जनसंवाद, भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याचा उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:29 IST2021-01-08T04:29:16+5:302021-01-08T04:29:16+5:30
सोसायट्या आणि वसाहतीत जावून थेट नागरीकांशी संवाद साधणारा जनसंवाद हा उपक्रम भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याच्यावतीने हाती घेण्यात आला आहे. ...

शांततेसाठी जनसंवाद, भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याचा उपक्रम
सोसायट्या आणि वसाहतीत जावून थेट नागरीकांशी संवाद साधणारा जनसंवाद हा उपक्रम भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याच्यावतीने हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमाचा एक भाग म्हणून आंबेगांव खुर्द येथील जांभूळवाडी रस्ता परिसरातील विवा सरोवर आणि परिसरातील पंधरा सोसायट्यातील पदाधिकार्यांची बैठक नुकतीच पार पडली. यावेळी वरिष्ठ पोलिस निरिक्षक जगन्नाथ कळसकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
याप्रसंगी सचिन कोळी, जनहित विकास मंचचे अध्यक्ष सुधीर कोंढरे, विवा सरोवर सोसायटीचे अध्यक्ष रमेश भावसार आणि ज्येष्ठ नागरीक संघाचे अध्यक्ष सोसायटी चेअरमन ग्रुपचे समन्वयक चंद्रकांत गुरव लेखक सत्येंद्र सिंह सचिव विक्रम पाटील, समृद्धीलेक शोअरचे अध्यक्ष चंद्रकांत थोरात, गुरुकृपा हाईटसचे अध्यक्ष प्रदीप काळे, सदगुरु हाईटसचे चंद्रकांत गुरव, लेकब्रीजचे अध्यक्ष अरविंद गांजरे, सचिव संदीप माने, विवा सरोवरचे सदस्य मनोहर घोडके, उद्धव बिचकुले ,एम.बी. पिसाळ आणि विविध सोसायटींचे पदाधिकारी उपस्थीत होते. सुत्रसंचलन ज्ञानेश्वर सोळसकर यांनी केले.
--
०४ धनकवडी पोलिस
फोटो ओळ - सोसायट्या आणि वसाहतीत जावून थेट नागरीकांशी संवाद साधणारा जनसंवाद उपक्रम उपक्रमा अंतर्गत आंबेगांव खुर्द विवा सरोवर आणि परिसरातील पंधरा सोसायट्यातील पदाधिकार्यांच्या बैठकीत मार्गदर्शन करताना वरिष्ठ पोलिस निरिक्षक जगन्नाथ कळसकर.