पुणे जिल्ह्यात स्वाइन फ्लूविषयी जनजागृती

By Admin | Updated: April 29, 2017 03:58 IST2017-04-29T03:58:41+5:302017-04-29T03:58:41+5:30

पुणे जिल्हा परिषद व इंदापूर पंचायत समिती आरोग्य विभाग आयोजित इंदापूर उपजिल्हा रुग्णालयात स्वाइन फ्लूविषयी जनजागृती

Public awareness of swine flu in Pune district | पुणे जिल्ह्यात स्वाइन फ्लूविषयी जनजागृती

पुणे जिल्ह्यात स्वाइन फ्लूविषयी जनजागृती

इंदापूर : पुणे जिल्हा परिषद व इंदापूर पंचायत समिती आरोग्य विभाग आयोजित इंदापूर उपजिल्हा रुग्णालयात स्वाइन फ्लूविषयी जनजागृती कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. हा उपक्रम जिल्ह्यात राबविण्यात येणार असून, त्याची सुरुवात इंदापूरपासून करण्यात आली आहे.
या कार्यशाळेस मार्गदर्शन करण्यासाठी पुणे जिल्हा परिषदेचे आरोग्य व बांधकाम समितीचे सभापती प्रवीण माने आले होते. त्यांनी स्वाइन फ्लूपासून बचाव करण्यासंदर्भात मार्गदर्शन केले. शहरातील उपजिल्हा रुग्णालय तसेच तालुक्यातील ८ प्राथमिक केंद्रे व ४४ उपकेंद्रे अतिशय चांगल्या पद्धतीने रुग्णांना सेवा देत आहेत. तालुक्यात अजून नवीन ७ केंद्रांची निर्मिती करण्यात येणार आहे. याचा फायदा गोरगरीब जनतेला होणार असून, आरोग्याच्या विविध सोई-सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. स्वाइन फ्लूची लस मोफत उपलब्ध करून दिली जाईल.
या कार्यशाळेस जिल्हा उप आरोग्य अधिकारी डॉ. जठार हे उपस्थित होते. ते म्हणाले, ‘रुग्णांनी स्वाइन फ्लूसंदर्भातील लक्षणे दिसल्यास तातडीने उपचार घेणे गरजेचे आहे. स्वाइन फ्लू होऊ नये म्हणून स्वच्छता राखली पाहिजे, प्रतिबंधित लस लवकरात लवकर घेतल्या पाहिजेत. या वेळी इंदापूरमधील प्रसिद्ध हृदयरोगतज्ञ डॉ. पाणबुडे यांनी मार्गदर्शन केले. या कार्यशाळेस डॉ. चंदनशिवे, डॉ. खाडे, इंदापूर उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. सदानंद काळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत महाजन, प्रशांत शिताप, स्थानिक नगरसेवक अनिकेत वाघ हे उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: Public awareness of swine flu in Pune district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.